महाराष्ट्र

कोरोना विरुध्द लढा : अधिकारी महासंघाचे उपाध्यक्ष पाटील यांची ५१ हजार रुपयांची देणगी

मुंबई, दि.7 : महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे उपाध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यासन अधिकारी श्री. विष्णू ल. पाटील यांनी आज मुख्यमंत्री सहायता निधी- कोविड-19, साठी 51 हजार रुपयाचा धनादेश मुख्यमंत्री कार्यालयाकडे सुपूर्द केला.

कोविड विषाणू प्रार्दुभावाच्या विरोधात शासनामार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी अधिकाधिक निधी देणगी म्हणून देण्यात यावा, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे. त्या अनुषंगाने श्री. पाटील यांनी ही देणगी दिली आहे. या आधी महासंघाचे मुख्य सल्लागार श्री. ग.दि. कुलथे यांनी आपले एप्रिल महिन्याचे संपूर्ण निवृत्ती वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देणगी म्हणून दिली आहे.

Most Popular

To Top