महाराष्ट्र

‘लॉकडाऊन’मध्ये बांधकाम मजुरांना आवश्यक मदतीसाठी उपसभापती नीलम गोऱ्हे यांचे प्रयत्न


मुंबई दि. 16: संपूर्ण भारतात लॉकडाउन झाल्यानंतर सध्या सर्व व्यवसाय थांबले आहेत. दररोज शारीरिक कष्ट करणारे मजूर, कामगार व व्यावसायिक यांचे जीवन या कालावधीत सुखकर व्हावे यासाठी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शासन स्तरावर आवश्यक असणारे निर्देश दिले आहेत.

लॉकडाऊनमुळे 26 मार्चनंतर संघटित व असंघटित मजुरांचे  उपजीविका साधन थांबल्यामुळे विशेष आर्थिक पॅकेज देण्याबाबत कामगार आयुक्तांना सूचना दिल्या, तसेच 27 मार्च रोजी कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पत्र पाठविले.  

उपसभापती कार्यालय हे मुख्यमंत्री कार्यालय आणि कामगार विभाग कार्यालय यांच्या संपर्कात आहे. लॉकडाऊन कालावधीत शासनाने अनेक उपाययोजना जाहीर केल्या व त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे. कामगारांसाठीची प्रस्तावित मदत लवकरच जाहीर होईल अशी अपेक्षा असल्याचे असे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.

Most Popular

To Top