By
Posted on
भारतीय क्रिकेट संघ निवडण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला विशेषाधिकार दिले जातात असं हरभजन सिंग बोलला आहे.
आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी महेंद्रसिंग धोनीची निवड झाल्याच्या पार्श्वभुमीवर बोलताना हरभजन सिंगने हे वक्तव्य केलं आहे.
धोनी फॉर्ममध्ये नसला तरी त्याच्याकडे रणनीती आखण्याची योग्य क्षमता असून, यामुळे त्याने अनेकदा सामना आपल्याबाजूने झुकवला असल्याचं बीसीसीआय निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद बोलले होते.
यावर प्रतिक्रिया देताना हरभजनने आपणदेखील सीनिअर खेळाडू असून फक्त बॉलिंग नाही तर धोनीप्रमाणे सामना आपल्या बाजूने झुकवण्याची क्षमता असतानाही आपला विचार केला गेला नाही अशी टीका केली आहे.