बीड | राज्याच्या महिला आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे माझी ताई आहे, असा दम देऊन मुलींची छेडछाड केल्याचा प्रकार बीडमध्ये घडलाय. विठाई नर्सिंग कॉलेजचा प्राचार्य राणा डोईफोडे याच्यावर हे आरोप करण्यात आलेत. धक्कादायक बाब म्हणजे तो पाली गटाच्या जिल्हा परिषद सदस्या सारिका डोईफोडे यांचा पती आहे.
याप्रकरणी पीडित मुली आणि त्यांच्या नातेवाईकांनी राणाला विठाई नर्सिंग कॉलेजमध्ये चोप दिला. त्यानंतर बीड ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
