मुख्य बातम्या

ऊसतोड कामगाराने, दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत जागतिक स्तरावर नाव कमावले

ऊसतोड कामगाराने, दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत जागतिक स्तरावर नाव कमावले

बीड: परिस्थितीवर मात करून जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर, एका तरुण ऊसतोड कामगाराने, दिव्यांग क्रिकेट स्पर्धेत जागतिक स्तरावर नाव कमावले आहे. पायाने दिव्यांग असतानाही आई-वडिलांना मदत म्हणून, तो उस तोडी करायचा आणि त्याच बरोबर आपलं स्वप्न साकार करण्यासाठी तो खेळ देखील खेळायचा. आता हाच ऊसतोड कामगार असणारा तरुण, भारताचा क्रिकेट संघामध्ये सामील झाला आहे. हे करत असताना आणि धनुर्विद्या स्पर्धेत देखील गोल्डमेडिलिस्ट असतांना, त्याचा जगण्याचा संघर्ष कायम सुरूच आहे.

बीडच्या केज तालुक्यात असणार्‍या डोणगाव येथे ज्योतीराम घुले राहतात. ज्योतीरामचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले, तर उच्च शिक्षण बीडमध्ये झाले. घरी केवळ तीन एकर शेती, त्यामुळे आई-वडील ऊस तोडणी ला जात होते, त्यावरच कुटुंबाचा गाडा चालायचा. तर घरची परिस्थिती हलाखीची असल्याने, ज्योतीरामला देखील वयाच्या दहाव्या वर्षीच हाती कोयता घ्यावा लागला. आई-वडिलांना मदत म्हणून तो ऊस तोडणीसाठी जात होता. तीन वर्ष ऊसतोड कामगार म्हणून त्यांनी काम देखील केलं. त्यानंतर कापूस केंद्रावर मजुरी देखील केली आणि हे काम करत असताना, त्याने धनुर्विद्या सह आपला क्रिकेटचा छंद देखील जोपासला.

Most Popular

To Top