स्वातंत्र्य मिळवत असताना मला माझा बाप भाऊ आणि कुटुंब व्यवस्था धुडकावून लावायची नाही :ॲड.सुजाता शामसुंदर मोराळे
बीड :बदलत्या युगामध्ये स्वतःकडे बघताना एक वेगळा आनंद आणि प्रसन्नता येत आहे एका घराची लेक म्हणून बापाची मुलगी म्हणून भावाची बहीण म्हणून तर मला त्यांच्याकडून मिळत असणार्या स्वातंत्र्याचा अभिमान वाटतो आहे,तसं तर तो माझा अधिकार आहे मग अभिमानाचे तरी काय पण नात्यांत जबाबदारी असते कधी त्यांनी तर कधी आपण निभवायची असते आणि निभावली सुद्धा पाहिजे यात शंका नाही कारण हे स्वातंत्र्य मला अनेक युगाच्या तपानंतर मिळाले आहे ,अनेक महामाता आणि महामाणवांच्या ऊपकारानंतर मिळाले आहे,अनेक सामाजिक संस्था,युवक कार्यकर्ते आणि स्री सन्मानासाठी लढणार्या राजकीय नेते पक्ष यांच्या आंदोलनाला आलेल यश आहे….मग ते किती टक्के आले हा मुद्दा गौण असला तरी मिळाले हे निश्चित आहे.
तसं या जगात एखादी गोष्ट मिळणं कठीण असतं आणि मिळालेलं यश जबाबदारीने टिकवणं त्याहून कठीण, कालपर्यंत हीच खरी शक्ती बाप भाऊ नवरा आणि मुलं यांच्या मुठीत जेरबंद असली तरी ते व्यक्त होते आहे हे सुद्धा कमी नाही, कारण प्रत्येक क्रांतीचा एक प्रवास कासवगतीने क्रांतीच्या झेंड्याकडे जात असतो तो सध्या सुरू आहे असं मला वाटतं, याच वेळी एक महिला म्हणून माझ्या काही जबाबदाऱ्या मला सुनिश्चित कराव्याच लागतील जेणेकरून समाजाच्या नजरेत मला मिळत असलेल्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उभा राहणार नाही.
स्री स्वतंत्र झाली म्हणजे नेमकं काय? या अगोदरचा स्री चा समाजातील दर्जा नेमका काय? तिच्या हातात कुटुंबासह आणखी कुठल्या व्यवस्था होत्या का ? होत्या तर तिने त्या जपल्या का? तिच्यावरचं शंका उपस्थित का केल्या गेल्या? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतील सुद्धा…… कारण जशी ती एक मुक्त स्री होती तशीच ती एक घराची लक्ष्मी सुद्धा होती, ती एका घराचे मांगल्य सुद्धा आहे, ती विश्वास टाकलेली बापाची अब्रू सुद्धा आहे, होय जसं तिचं नातं मुक्तीशी आहे तसंच ऊंबर्याशी सुद्धा आहे…..आणि हाच ऊंबरा जर स्वतंत्र बहाल करायला तयार असेल तर त्या ऊंबर्याची मर्यादा सुद्धा आपण सांभाळली पाहिजे, कारण त्यात आपला पुरुषार्थ नाही तर बाप आणि भाऊ रहात असतो, आपला आयुष्याचा जोडीदार नवरा रहात असतो , हिम्मत देणारा सासरा रहात असतो, आणि त्यांनी स्वःताला मागे सारून या कुटुंबाची जबाबदारी आपल्याला दिलेली असतें ,नव्हे त्यांनी मुक्त केलेली असते कैक पिढ्यांची गुलामी ऊंबर्या बाहेर मोठ्या विश्वासाने.
परंतु आज याच स्वातंत्र्यावर लोक बोट ठेऊ लागलेत, दिलेल्या स्वतंत्र यावर शंका उपस्थित करू लागले, कारण स्वातंत्र्य दाता उंबऱ्याच्या आत आणि आपण मात्र बाहेर वागत आहोत ते चुकीचेच, उंबर्याच्या बाहेर काम करत असताना उंबर्याच्या आतल्या माणसाची काळजी नेहमी काळजात असावी लागते, परंतु त्यांच्याच विश्वासाचा घात होऊन चुकून आज कोणी मुलांना टाकून कोणी नवऱ्याला सोडून कोणी बाप एकटा घरात ठेवा कुठलाही विचार न करता निघून जात आहे, किंवा काही जणी एक तासापूर्वी मर्यादित काळ तो बाहेरच्या व्यक्तीला देत आहे, अशा वेळी कोणी आपल्याला पाहतोय त्याचीही नजर आपल्यावर आहे आपला भोग घेऊन झाल्यावर तो आपल्याला काय देणारं आहे, काय हिरावून घेणार आहे याची जाणीव आपण ठेवत नाहीत, आणि पुन्हा जन्म होतो तो अविश्वास आणि संघर्षाचा आणि चुकलेली एक महिला पुन्हा सरकसट महिलांना गुलामीच्या आगीत ढकलून देत नव्याने जाळण्याचे षडयंत्र रचत असते , आणि अनेक पिढ्यांचे कष्ट संघर्ष यातुन मिळालेल्या स्री मुक्तीच्या लढ्यावर पुन्हा नवा खराटा फिरला जातो.
मुळात स्री आणि पुरूष हे निश्चित आहे ते एकमेकांशिवाय नाही ,ती निसर्गाची व्यवस्था आहे भगवान ओशो ने संभोगाकडुन मुक्तीचा मार्ग सांगीतला असला तरी भारतीय समाज व्यवस्थेत विश्वास आणि कौटुंबिक जीवन याचे महत्त्व नाकारता येत नाही, भावनात्मक बंध माणसाला एकमेकांच्या नात्यांत कायम करतात हा विश्वास अजूनही जिवंत आहे, पण भावनांना आळा घालण्याचे काम सुद्धा आपले आहे, नाहींतर ज्या घरात एका पुरूषासोबत आपण असतोतच परंतू ऊंबरा ओलांडून मात्र आपण दुसर्याच्या नजरेत रखेल वाटाव इतकी सहज उपलब्ध होणारी बाई आपण आहोत का?? सेक्स हि गरज आहे आणि त्यासाठी एका व्यक्तीला कुटुंब प्रणालीने अधिकार दिला सुद्धा आहे (अर्थातच हा नियम स्री पुरुष दोघांनाही लागु आहे) मग याला पर्याय कशासाठी हवा आहे, तरीही का आपण विवाहबाह्य संबंधांना परवानगी देतो आहोत, वन नाईट वीथ फ्रेंड कशासाठी हवा असतो?? हे घडल्यानंतर ज्या नजरेत मला परिक्षा द्यावी लागते त्यावेळी मी बदनाम होताना माझा जन्म देणारा बाप खाली पाहुन चालतो तो कोणाच्या नजरेत नजर घालून बोलून शकत नाही, म्हणजेच माझे भावनांचे बंध जसे एखाद्या परपुरुषांसोबत जोडले जातात तसे एका बापाच्या जन्माला पुरणारी अब्रू सुद्धा मीच असते हा बंध मात्र मीच विसरून जाते हे दुर्भाग्य पुर्ण आहे…..
आज कित्येक मुलींनी प्रियकराला सर्वस्व दिले पुढे लग्न नाही झाले आणि प्रकरण आत्महत्येपर्यंत गेले , म्हणजे बदनामी वाढतच गेली ,एक जीव कायमचा गेला आणि बाप ऊभ्या आयुष्यासाठी खचुन मेला ,ना कधी नातेवाईकांना तोंड दाखवता आलं नाही कधु गावकी भावकीत ऊभा राहिला तो तीला गमावताना उभं आयुष्य गमावून बसला, यांची जाणीव सुद्धा मला व्हायला हवी,कारण मी मुक्त भारताची मुक्त स्री आहे, माझा विरोध प्रेमाला नाहीच ओं माझा विरोध त्यांतील विकृतीला आहे …… कारण पुरुषांची मक्तेदारी नाकारत असताना त्यांच आपल्याशी अतुट नातं आहे हे विसरून आपल्याल कसे चालेल एकुणच काय तर आता हा अघोरी खेळ थांबला पाहिजे,तीला कार्यालयात, नौकरीच्या आमिषाने, कधी स्री स्वतंत्र म्हणुन तर कधी वरकरणी प्रेम करून, कधी आर्थीक मदत करून तर कधी मजबुर करून तीला पलंगावर आडवी करून स्री मुक्तीची चळवळ कुमकुवत करणार्या पुरूषार्थाचा मी धिक्कार करते, माझ्या ताईंओ सहमतीने झालेल्या गोष्टींवर जगातल्या कुठल्या न्यायालयात न्याय नाही मला सन्मान हवा तो आत्मसन्मान आहे ,एका रात्रीसाठी काही क्षणांचा गुलाल अंगावर टाकुन आयुष्य सडवत ठेवणारी गुलामी मी ऊघड्या डोळ्यांनी नाकारते आहे,मला स्वतंत्र हवं आहे ते सामाजिक, शैक्षणिक,आणि इतर क्षेत्रांत बरोबरीने पण हे स्वातंत्र्य मिळवत असताना मला माझा बाप भाऊ आणि कुटुंब व्यवस्था धुडकावून लावायची नाही कारण आयुष्याला मर्यादा असाव्याच लागतात .
ॲड.सुजाता शामसुंदर मोराळे