“कोविडच्या तिसऱ्या लाटेतही..घाबरून नका, काही होत नाही म्हणत… कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये जाऊन धीर देणारे राज्यातील एकमेव आमदार….!”
बीड : कोरोनाच्या महामारीत मी..मी म्हणणारे आमदार, खासदार व अन्य लोकप्रतिनिधी घरात घरोबा करून बसले होते, काही बोटांवर मोजण्याइतके लोक लोकांमध्ये राहुन लोकांचे जीव वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून कोरोनाच्या काळात काम करत होते, अनेक लोकप्रतिनिधी व प्रशस्त लोकांना घरात बसून सुद्धा करोनाने सोडले नाही, तर कोरोना +ve रुग्णांची प्रेत जळणाऱ्या (दफनविधी) करणाऱ्या लोकांना कोरोना झाला नाही,कारण ते कोरोनाला घाबरले नाहीत ही वस्तुस्थिती आजपर्यंत सर्वांनी पाहिली आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत व अलीकडच्या काळातील दुसऱ्या लाटेत अनेकांना उपचाराविना, सोई सुविधा विना स्वतःचा, नातेवाईकांचा, स्नेही जणांचा व मित्र परिवावाराती व्यक्तीचा जीव गमवावा लागला आहे, याच काळात आमदार सुरेश अण्णा धस हे आष्टी-पाटोदा/शिरूर(का) व बीड जिल्ह्यातील जनतेच्या पाठीशी कोरोनाच्या संकट काळातील देव म्हणून उभे राहिले असे म्हणण्यास वावगे नसणार आहे, कारण एक नाही-दोन नाही, तर २० च्या वरती कोविड सेंटरची उभारी करून रुग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध करून दिली, मग त्यामध्ये गावोगावी गटा नुसार, विलगिकरण बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड, Baipap Machine, ऑक्सिजन Consuntratar, रेमडीसीविर इंजेक्शन, मोफत जेवन, रुग्णवाहिका इत्यादी सर्व सेवा सुविधा मॅचिंद्रनाथ देवस्थान ट्रस्ट सावरगाव (मयांबा),आष्टी तालुका दुध संघ, व सुरेश धस मित्र मंडळ यांच्या वतीने एका व्यक्तीच्या पुढाकार, धडप, जाणीव व कळवळा यामधून महाराष्ट्राला पहायला मिळाला आहे.
आज घडीला कोरोनाचा तिसरा टप्पा संथ गतीने प्रादुर्भाव दिसून येत आहे, दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे,पण वैद्यकीय शास्त्रातील तज्ज्ञांच्या माहितीनुसार ही स्ट्रेन जास्त भीती बाळगण्याची नाही असे सांगण्यात आले असले तरी, हात मोकळे वर करून चालणार नाही, कारण लोक तात्पुरती तपासणी व औषध उपचार करण्याच्या भानगडीत राहुन ते कधी धोक्याच्या स्टेज मध्ये जात आहेत याची त्यांना माहिती ही होत नाही, त्यामुळे रुग्णांनी परिस्थितीचे गंभीर्य नाही तर भान राखण्याची ही वेळ आहे असं आमदार सुरेश धस अण्णा यांनी अनेक वेळा समाज माध्यमातून सांगितले आहे.
काल रात्री मुंबईला जात असताना इम्पल्स कोविड हॉस्पिटल अहमदनगर या ठिकाणी जाऊन आष्टी, पाटोदा व लगतचे नातेवाईक असलेल्या जामखेड, कर्जत व नगर जिल्ह्यातील रुग्णांना उशिरापर्यंत भेट देऊन रुग्णांच्या जवळ जाऊन धीर दिला, काळजी करू नका तुम्हाला काही होत नाही,भरपूर जेवण करा, शक्य होईल तेवढा अराम करा,अतिरिक्त मोबाईलचा वापर टाळावा, अशा अनेक प्रकारच्या सुचना आण्णांनी प्रेमाने कोरोना रुग्णांना केल्या तेव्हा सर्व रुग्ण अगदी मन उत्तेजित करत चेहऱ्यावर आण्णा प्रत्यक्ष भेटण्यासाठी आल्याचे समाधान व्यक्त करत आहेत.