पुरग्रस्तांसाठी तृप्तीताई देसाई मैदानात ; एकरी पन्नास हजार रुपये भरपाईची शासनाकडे मागणी
सांगली : तृप्ती देसाई यांनी भूमाता फाउंडेशन च्या माध्यमातून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात अनेक गावांमध्ये स्वतः जाऊन शेकडो नागरिकांना धान्य, साड्या, चटई, ब्लॅंकेट, सॅनिटरी पॅड, चपला इ. स्वरूपात मदत पोहोचवली.
कोल्हापूर जिल्ह्यातील घुणकी, नरसोबावाडी, कुरुंदवाड, घोसरवाड, दानवाड, खिद्रापूर तसेच सांगली जिल्ह्यातील धामणी रोड येथील पूरग्रस्त नागरिकांचा यात समावेश आहे.
ही मदत करीत असतानाच कोल्हापूर जिल्ह्यातील पिकाचे भरपूर नुकसान झाले असल्यामुळे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणीही तृप्ती देसाई यांनी केली आहे आणि ज्यांनी कोणतेही कर्ज घेतलेले नाही त्यांना एकरी पन्नास हजार रुपये भरपाई द्यावी, तसेच पूर आल्यावर नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही तृप्ती देसाई यांनी सरकारकडे केली आहे.
जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील व्हिडिओ था म्हणून काम करीत असलेले सर्व डॉक्टर्स आणि सर्व नर्स यांचादेखील व्हॅपोरायझर आणि साड्या देऊन भूमाता फाऊंडेशन च्या माध्यमातून सत्कार करण्यात आला.
४,५ आणि६ ऑगस्ट तीन दिवस तृप्ती देसाई सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात दौऱ्यावर होत्या. 2019 मध्ये आलेल्या पुरानंतर भरपूर मदत या भागात आली होती परंतु सध्या तुटपुंजी मदत येत असल्यामुळे अनेक संस्थांनी पुढाकार घेऊन या भागात मदत करावी असे आवाहन तृप्ती देसाई यांनी केले आहे.