मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मांडलेले मुद्दे:
नमस्कार, बऱ्याच दिवसांनी आपण भेटत आहोत आणि मी आता कोणते निर्बंध शिथिल करतोय याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे
जुलैमध्ये विक्रोळी, चेंबूरमध्ये दरडी कोसळल्या तर रायगड, रत्नागिरी, सांगली- कोल्हापूर मध्ये मोठी पूर परिस्थिती आली
यात ४,३७,७३१ नागरिकांचे सुरक्षितपणे स्थलांतर केले, तर ३४९ निवारा केंद्रांमध्ये ४७,२१४ नागरिकांची सोय केली
पूरपरिस्थितीचा सर्व आढावा घेऊन सर्वात मोठ्या ११,५०० कोटी रुपये मदत जाहीर केली
अशा परिस्थितीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची नागरिकांची मागणी
आता केवळ समिती स्थापन करून थांबणार नाही, तर त्या सूचनांची अमलबजावणी करणार
दुसऱ्या लाटेत आयसोलेशन खाटा, ऑक्सिजन खाटा, व्हेंटिलेटर्स, प्रयोगशाळांची संख्या वाढवली
लसीकरणाचा वेग वाढत आहे
कोरोना विषाणूच्या बदलत्या रुपांचा अभ्यास करण्यासाठी मुंबईत जिनोम सिक्वेंसिंग लॅब सुरू केली
आतापर्यंत १ कोटी १८ लाख लोकांना दोन्ही डोसेस दिले आहेत
लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी मुंबईतील लोकल प्रवास १५ ऑगस्टपासून सुरू होणार
दुसऱ्या डोसनंतर प्रवास करण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी अनिवार्य
विशेष ॲपच्या माध्यमातून रेल्वे पास दिला जाणार
स्मार्टफोन नसलेल्यांसाठी प्रभाग कार्यालये, उपनगरीय रेल्वे स्थानकांवर फोटो पासेसची सोय
स्वातंत्र्य दिन ८ दिवसांवर आला आहे. आपण प्रतिज्ञा करूया की, लवकरात लवकर आम्ही कोविडपासून माझा देश, माझा गाव, माझं शहर, कुटुंब मुक्त करू.
जय हिंद, जय महाराष्ट्र!