प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दौंड तालुक्यातील पहिल्या टप्यातील १४८६ घरकुलांना मंजुरी !
दौंड :;प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दौंड तालुक्यातील पहिल्या टप्यातील १४८६ घरकुलांना मंजुरी एकूण २.५० लक्ष अनुदानापैकी राज्य शासनाच्या हिश्याच्या प्रति लाभार्थी १.०० लक्ष अनुदानासाठी पुणे महानगर विकास प्राधिकरणास १४ कोटी ८६ लक्ष रुपयांचा निधी वर्ग करण्यास शासनाची मंजुरी मिळाली असून केंद्र शासनाच्या हिश्याचे प्रति लाभार्थी १.५० लक्ष अनुदान देखील पुणे महानगर विकास प्राधिकरणास लवकरच प्राप्त होणार आहे.
पहिल्या टप्यातील प्रकल्प अहवालास दिनांक २९/०८/२०१९ रोजी केंद्रीय मंजुरी आणि देखरेख समितीची मंजुरी मिळून देखील विविध अडचणींमुळे निधी मिळण्यास विलंब होत होता, मंजुरी मिळालेल्या प्रकल्प अहवालातील लाभाऱ्यांना राज्य व केंद्र शासनाचे अनुदान मिळावे यासाठी आपण राज्याच्या गृहनिर्माण विभागाचे मुख्य सचिव श्री. मिलिंद म्हैसेकर साहेब, श्री. सुहास दिवसे साहेब आयुक्त पुणे महानगर विकास प्राधिकरण , श्री. दिलीप मुगलीकर कार्यकारी अभियंता पीएमएवाय, म्हाडा यांचे कडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
मंजूर लाभार्थ्यांना लवकरच कार्यारंभ आदेश देण्यात येणार असून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलासाठी प्रति लाभार्थी रुपये २.५० लक्ष अनुदान प्राप्त होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचा दौंड तालुक्यातील अधिकाधिक नागरिकांना लाभ मिळावा यासाठी पुढील टप्यातील प्रकल्प अहवालास लवकरात लवकर मंजुरी मिळावी यासाठी आपण प्रयत्नशील आहोत.