मुख्य बातम्या

दिपाली सय्यद भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील १ हजार मुलींना प्रत्येकी ५००००/- रुपये

दिपाली सय्यद भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील १ हजार मुलींना ५००००

महासत्ता : दिपाली सय्यद भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील १ हजार मुलींना ५०००० रुपये ठेव पावती,  वितरण राज्याचे राज्यपाल मा. भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले.

पूर आला की लाखो घरे बेचिराख होतात. पूरग्रस्तांना स्वतःला सावरावं लागतं. या उपक्रमाच्या माध्यमातून उद्ध्वस्त झालेल्या पूरग्रस्तांना उभे राहण्यासाठी बळ दिले. सांगली येथे आलेल्या महापुरातील १हजार आपत्तीग्रस्त मुलींना दिलेला शब्द पाळला .

भारतात सामाजिक कार्याची परंपरा खुप प्राचिन आहे. आपल्याकडे असणाऱ्या साधनसंपत्तीचा उपयोग सर्वांनीच चांगल्या कामासाठी करावी अशी इच्छा व्यक्त केली. यावेळी त्यांनी सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये विवाह झालेल्या जोडप्यांना शुभाशिर्वाद दिले. ठेव प्रमाणपत्राचे वितरण केले. पैशांचा योग्य वापर करुन माणसांवर प्रेम करणे हा मार्ग अंधारातून प्रकाशाकडे जाणारा आहे. राज्यपाल महोदयांच्या उपस्थीतीत त्यांच्या शुभ आशिर्वादाने हा सोहळा पार पडला त्याबद्दल त्यांचे व केंद्रिय मंत्री कपील पाटील साहेब, जल संधारन मंत्री जयंत दादा पाटील, खासदार संजय काका पाटील, खासदार धैर्यशील माने आदी मान्यावर उपस्तीत होते.

Most Popular

To Top