मुख्य बातम्या

राष्ट्रवादीच्या व्यापार आणि उद्योग सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी आत्तापर्यंत संबंध महाराष्ट्र पिंजून काढलाय …

राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पक्षवाढीची तळमळ -: नागेश फाटे

राष्ट्रवादीचे उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांचा आजपासून कोकण दौरा सुरु

पंढरपूर (प्रतिनिधी)

राजकारणात माहीर असणारे देशातील नेते खासदार शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली वाढत असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विस्तारित जावा, यासाठी पक्ष पातळीवर प्रयत्न सुरू असताना राज्यातील पदाधिकाऱ्यांमध्ये ही पक्षवाढी विषयी मोठी तळमळ असल्याचे मत राष्ट्रवादीच्या व्यापार आणि उद्योग सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी व्यक्त केले. पश्चिम महाराष्ट्राचा दौरा आटोपून कोकण दौरा सुरू करण्यापूर्वी ते बोलत होते.

गेल्या दोन महिन्यापूर्वी पंढरपूर तालुक्यातील उद्योजक नागेश फाटे यांची राष्ट्रवादीच्या व्यापार आणि उद्योग सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली ,थोड्याच अवधीत उद्योगात मोठे यश संपादन करणाऱ्या फाटे यांनी मिळालेल्या संधीचा वापर करण्यास सुरुवात केली .राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सोपविण्यात आलेल्या पक्षबांधणीच्या कार्यास जोमाने सुरुवात केली.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मागील महिन्यात त्यांनी आपल्या झंझावती दौऱ्यास प्रारंभ केला. राज्यातील विदर्भ ,मराठवाडा ,खानदेश, उत्तर महाराष्ट्र ,पश्चिम महाराष्ट्र ,या भागांचा दौरा करून कोकण दौऱ्यास प्रारंभ केला सोमवार दिनांक 18 ऑक्टोबर रोजी पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्याचा शेवट करण्यात आला, कोल्हापूर मध्ये राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रवादीच्या पक्ष संघटन पातळीवर चर्चा करण्यात आली यावेळी शहर अध्यक्ष आर के पोवार, सरचिटणीस सुनील देसाई तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ना. मुश्रीफ यांनी प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांना संघटनात्मक पक्ष बांधणीबाबत मार्गदर्शन केले. या बैठकीनंतर नागेश फाटे यांनी आपल्या दौऱ्याबाबत माहिती दिली. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी पक्ष बांधण्याचे काम मोठ्या तळमळीने करत असून माजी केंद्रीय मंत्री खा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा मोठा विस्तार व्हावा, अशी आशा बाळगून असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ग्रामीण कोल्हापूर ऐ .वाय पाटील, शहर (जिल्हा )अध्यक्ष उद्योग-व्यापार विभाग रामराजे बदाले राष्ट्रवादी ता . उपाध्यक्ष पंढरपूर कल्याण कुसूमडे आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादीच्या व्यापार आणि उद्योग सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी आत्तापर्यंत संबंध महाराष्ट्र पिंजून काढला आहे.सोमवारी कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा आटोपल्यानंतर हे कोकण दौऱ्यावर निघाले आहेत. मंगळवार दिनांक 19 पासून शुक्रवार दिनांक 21 ऑक्टोबर अखेर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पनवेल ठाणे डोम्बिवली आणि उल्हासनगर असा त्यांचा दौरा ठरला असून मंगळवारी सकाळीच त्यांनी सिंधुदुर्ग कडे प्रयाण केले आहे.

Most Popular

To Top