मुख्य बातम्या

काँग्रेस-राष्ट्रवादीच माझ्या माथी आलेल पाप मी निस्तरतोय: मा. नितीन गडकरी

काँग्रेस-राष्ट्रवादीच माझ्या माथी आलेल पाप मी निस्तरतोय: मा. नितीन गडकरी

नागपूर : गेली ११ वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या गोंधळाविरोधात मनसे रस्ते आस्थापना विभागाचे कार्याध्यक्ष योगेश चिले यांनी मागच्या काही महिन्यांत रान उठवले होते. आपल्या अभ्यासपुर्ण लाईव्हद्वारे त्यांनी कोकणवासियांना या विषयावर जागे केले होते. मुंबई-गोवा महामार्गाचे मुख्य अभियंता, सहाय्यक अभियंता यांच्याशी सातत्याने चर्चा करून, आंदोलने करून मनसेने या विषयावर प्रशासनालाही झोप लागु दिली नव्हती. आज याच विषयावर कोकणचे सुपुत्र मनसे सरचिटणीस श्री. मनोज चव्हाण आणि रस्ते आस्थापना कार्याध्यक्ष श्री. योगेश चिले यांनी केंद्रीय मंत्री, रस्ते परिवहन व महामार्ग मा. श्री. नितीनजी गडकरी यांची त्यांच्या नागपुरच्या घरी भेट घेतली.

त्या काँग्रेस-राष्ट्रवादीच पाप मी निस्तरतोय. पण माझ वैयक्तिक लक्ष आहे या रस्त्यावर. मी कोकणाला लवकरात लवकर चांगला रस्ता देणार. माझा शब्द आहे हा आणि मी शब्द पाळतो. म्हणुनच कामाचा स्पिड वाढवण्यासाठी ज्यांच्यामुळे हा रस्ता रखडलाय त्या दोन काँट्रॅक्टरना मी बदलतोय.. काळजी करू नका”… गडकरी साहेबांनी चेहर्यावरच स्मितहास्य कायम ठेऊन मनसेच्या शिष्टमंडळाला आश्वस्त केल.

खरतर गडकरी साहेबांची शुगर आज वाढलेली होती. त्यामुळे ते त्रासलेले होते पण राजसाहेबांनी पाठवल आहे हे कळल्यावर त्यांनी आवर्जुन चौकशी केली. विषय समजुन घेऊन “साहेबांना सांगा हा विषय मी लवकरच संपवतोय” असा निरोपही शिष्टमंडळाला दिला.

 

Most Popular

To Top