By
Posted on
अभिनेत्री आलिया भट्ट कॉलिंग सहमत या पुस्तकावर आधारित चित्रपटात झळकणार आहे.
मेघना गुलजार या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.
या चित्रपटात आलिया एका काश्मीरी मुलीची भूमिका साकारणार आहे. जिचे लग्न एका पाकिस्तानी अधिकाऱ्याशी होते. 1971साली झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान ती भारतातील गुप्त माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांना देते.
या चित्रपटात आलियासह अभिनेता विकी कौशल ही दिसणार आहे. हा चित्रपट सिक्का या पुस्तकावर आधारित आहे. मेघना गुलजार हिच्या तलवार या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर ती कॉलिंग सहमत घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.
मेघनाच्या आगामी चित्रपटाचे नाव अजून निश्चित करण्यात आलेले नाही. पुढील महिन्यापासून या चित्रपटाचे चित्रिकरण सुरु होऊ शकते. जंगली पिक्चर आणि धर्मा प्रोडक्शन मिळून या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.