टेक ज्ञान

आपण मेल्यावर आपल्या फेसबुक अकाउंटचं काय होणार ?

आपण मेल्यावर आपल्या फेसबुक अकाउंटचं काय होणार भाऊ?

 

आज घडीला १९० कोटींपेक्षा अधिक लोकं फेसबुकवर अ‍ॅक्टिव्ह आहेत मंडळी!! पण रोज यांच्यातल्या शेकडो लोकांचा काहीना काही कारणाने मृत्यू होत असणार. मग या मृत लोकांचं फेसबुक अकाउंट तसंच कायम पडून राहतं का? तर नाही. फेसबुककडून त्या अकाऊंटला मेमोरियलाईज केलं जातं. म्हणजेच ते अकाउंट डिलीट न होता तसंच जपून ठेवलं जातं. जेणेकरून त्या अकाउंटवरील पोस्ट्स आणि फोटोज बघून लोक त्या मृत व्यक्तीच्या आठवणींना उजाळा देतील. अशा मेमोरियलाईज केलेल्या व्यक्तीच्या अकाऊंटवर रिमेम्बरींग हा शब्द लावला जातो. म्हणजे थोडक्यात आपण त्या व्यक्तीला मिस करतोय.

पण फेसबुकला कसं कळतं की ती व्यक्ती मृत झालीये? कळत नाही तर तर कळवावं लागतं. यासाठी आपल्याला सिक्युरिटी सेटिंगमध्ये लिगसी कॉन्टॅक्ट नावाचा पर्याय मिळतो. तिथं आपण एखाद्या नातेवाईक किंवा फेसबुक फ्रेन्डला आपल्या अकाऊंटचा वारसदार बनवून ठेवू शकतो. म्हणजे आपल्या मृत्युनंतर आपलं अकाउंट तीच व्यक्ती हॅन्डल करेल. काळजी करू नका.

o

त्या व्यक्तीला तुमचे मेसेज वाचण्याची किंवा अकाऊंटवरून काही पोस्ट करण्याची परवानगी नसेल. पण प्रोफाईल फोटो बदलणं, फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारणं, या गोष्टी त्याला हॅन्डल करता येतील. लिगसी कॉन्टॅक्टच्या पेजवरच खाली एक लिंक दिली गेलीय. तिथं एक फॉर्म भरून आपण एखादी व्यक्ती मृत झाल्याचं फेसबुकला कळवू शकतो. पण यासाठी त्याचं डेथ सर्टीफिकेट सादर करावं लागेल. ते वेरीफाय करून मग फेसबुक त्या व्यक्तीचं अकाऊंट मेमोरियलाईज करेल.

आपण मेल्यावर आपल्या फेसबुक अकाउंटचं काय होणार ?
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top