By
Posted on
मुंबई – जगाचा पोशिंदा शेतकरी संपावर असताना सरकार शांत कसे राहू शकते? हा तर सरकारच्या असंवेदनशीलतेचा कळसच आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
शेतात जाणाऱ्या बळिराजाने नांगर खाली ठेवला असून, चक्क संपाचे हत्यार उपसले आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक शेतकऱ्यांच्या बेमुदत संपाला बुधवारी मध्यरात्रीपासून सुरवात झाली. शेतकरी कर्जमाफी आणि शेतीमालाला योग्य भाव या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. आज पहाटे शिर्डी, मनमाड, नगर, सातारा याठिकाणी शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून आंदोलन केले. सरकारच्या विविध विभागांमधील समन्वय अभावामुळे शहरातील दूध, भाजीपाला पुरवठ्यावर संपाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
धनंजय मुंडे यांनी या संपाविषयी सरकारला लक्ष्य केले आहे.