मुख्य बातम्या

गणाई परिवाराचा “सावित्री जिजाऊ उत्सव “जल्लोषात सुरू

 

गणाई परिवाराचा “सावित्री जिजाऊ उत्सव “जल्लोषात सुरू

समाजात स्त्रियांना प्रत्येक क्षेत्रात प्रभुत्व मिळवता येत आहे ते म्हणजे केवळ एका अश्या स्त्री मुळे जिने अशक्य अश्या कठीण काळात एक धाडसी पाऊल उचलले . आज असा एक क्षेत्र नसेल जिथे स्वतःच्या अस्तित्वाला सिद्ध करण्यासाठी स्त्रिया सक्षम नाहीत. हे सर्व शक्य झाले ते केवळ “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले “मुळेच. असे विद्यार्थी भारती राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी दिली.

दगड गोळे, चिखल, शेणाचा मारा सहन करत शिक्षणाची पाटी समृद्ध करणाऱ्या साऊ ला नमन करत दर वर्षी गणाई परिवारा अंतर्गत ३ जानेवारी हा दिवस शिक्षक दिन म्हणून महारातष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयात साजरा केला जातो.असे विद्यार्थी भारती राज्यध्यक्षा पूजा गणाई यांनी सांगितले.

घरोघरी दिवा, कंदील ,रांगोळी काढून घरात गोड धोड पदार्थ बनवून आज सावित्रीउत्सव साजरा करा हा दिवस सण असून आजचा दिवस हा सुशिक्षित समाज घडवण्याच्या दृष्टीने एक महत्वाचं पाऊल ठरेल असे मत मराठी भारती अध्यक्षा ऍड पूजा बडेकर यांनी सांगितले.

आज अनेक सुशिक्षित तरुणींना किंवा शाळा महाविद्यालयातील विद्यार्थीनिंना सावित्रीबाई फुले कोण होत्या हे माहीत नसतं ही अत्यंत खंतजनक बाब आहे. आपण ज्यांच्यामुळे अक्षरांशी ओळख करू शकलो त्यांच्या बद्दल एका वाक्यातही लिहिता न येण ही खेदजनक बाब आहे. त्यामुळे घराघरात सावित्रीबाई पोचावी यासाठी घरातल्या एका तरी मुलीला साऊ माहीत असणे महत्वाचे आहे. तर तो घर सुशिक्षित होईल यात शंका नाही असे मत वाघिणी अध्यक्षाज्योती बडेकर यांनी मांडले.

सवित्रीबाई फुले जयंती ह्या निमित्ताने शाळा व महाविद्यालयांना भेट देऊन शिक्षकांना पुष्प देऊन त्यांचा सत्कार करत असतो . ज्यांच्यामुळे मुली आज प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर होत आहेत. अशा माऊलीची जयंती आपण शाळा महाविद्यालयात जाऊन साजरी केली पाहिजे. असे चिरंजीवी राष्ट्रीय अध्यक्षा सलोनी तोडकरी यांनी सांगितले.

वाई सातारा, माणगाव रायगड,पुणे दिवळे भोर, वाशीम, पालघर वसई विरार, ठाणे, मुंबई ,कल्याण, उल्हासनगर, नवी मुंबई अश्या विविध ठिकाणी जाऊन विविध शाळा महाविद्यालयात शिक्षकांच्या भेटी घेऊन हा दिवस साजरा केला गेला तसेच सर्व शिक्षक प्राध्यापक वर्गाचा ह्या मोहिमेला पाठिंबा आहे .असे विद्यार्थी भारती राज्यकार्यवाह आरती गुप्ता यांनी सांगितले.

संपर्क
8104571787

Most Popular

To Top