माझा जिल्हा

यिन च्या शहराध्यक्षपदी चेतन लिम्हण

पिंपरी चिंचवड ; सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) या उपक्रमांतर्गत महाविद्यालयीन अध्यक्ष व उपाध्यक्षांमधून शहराध्यक्षपदी व उपाध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया सकाळ च्या उपाविभागीय कार्यालयात उत्साहात पार पडली. यातुन पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्षपदी प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचा चेतन लिम्हण याची निवड झाली.

या उमेदवारांची एक वर्षासाठी निवड करण्यात आली. यात वर्षभर विद्यार्थ्यांना आपले नेतृत्व सिद्ध करता येणार आहे.

दरम्यान निवड समितीचे अध्यक्ष म्हणुन डॅा. विष्णू श्रीमंगले तसेच सदस्य म्हणुन प्रा. योगेश झांबरे, सहयोगी संपादक अविनाश म्हाकवेकर यांनी परीक्षक म्हणुन काम पाहीले. यिन राज्य ॲापरेटिंग अधिकारी नितीन धांडे- पाटील यांनी आयोजन केले होते.

Most Popular

To Top