महाराष्ट्र

पुणेकरांच्या सेवेत बाणेर येथे CAFE BUDDY’S ESPRESSO

CAFE BUDDY’S ESPRESSO या मोठ्या ब्रँड च्या काॅफी शाॅप चे उद्धघाटन संपन्न

CAFE BUDDY’S ESPRESSO यांसारख्या मोठ्या बॅंड चे काॅफी शाॅप चे औंध बाणेर लिंक रोड वर पुणेकरांच्या सेवेत सुरू करण्यात आले या काॅफी शाॅप चे उद्घाटन पुण्याचे प्रसिद्ध उद्योजक मा. संजय धनकवडे, मा.अशिषजी अंधारे, मा दिपकजी तांदळे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून परभणी चे प्रसिद्ध डॉ अनिलजी कांबळे, स्किल डेव्हलपमेंट बीड चे सहायक आयुक्त मा. सुशीलजी उचले यांची उपस्थिती होती. या वेळी उपस्थित मान्यवरांनी अजय पांगरकर व भागवत पांगरकर या तरुण उद्योजकांना शुभेच्छा देण्यात आल्या.
या वेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी बोलताना मी म्हणाले की परभणी जिल्ह्यासारख्या ग्रामीण भागातून येऊन पुण्यासारख्या मेट्रो शहरात स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपडणारा प्रत्येक जण आयुष्याच्या एका टप्प्यावर या सगळ्याचा सामना करत असतो ग्रामीण भागातून आल्यावर अनेक अडीअडचणी येतात त्यानंतर नोकरीच्या शोधात असताना पुण्यासारख्या शहरात हवी तशी नौकरी न मिळणे अशा या संघर्षाने व्यापून टाकले असताना या तरुण युवकांनी शून्यातून प्रवास सुरू करत आज पुण्या सारख्या मेट्रो शहरात अजय पांगरकर व भागवत पांगरकर यांनी पुणे येथे CAFE BUDDY’S ESPRESSO या काॅफी शाॅप हे पुणेकरांच्या सेवेत सुरू केले. आज ही आपल्या ग्रामीण भागातील युवकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे ग्रामीण भागातून आलो असलो तरी जिद्द चिकाटी असेल तर आपण जिंकू शकतो असे दाखवून दिले यांचा आदर्श घेऊन ग्रामीण भागातील युवकांनी वाटचाल करण्याची गरज असल्याचे मत मी व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.
या काॅफी शाॅप मध्ये जगातील 20 प्रकारच्या काॅफी आहेत तसेच या काॅफी ला विशिष्ट पद्धतीने बनवले जाते या काॅफी चे पुण्यातील काॅफी प्रेमीनी लाभ घ्यावा असे आवाहन अजय पांगरकर व भागवत पांगरकर यांच्या वतीने करण्यात आले.

Most Popular

To Top