– शिक्षणासाठी शहरात आलेल्या तरुणीवर एका मातब्बर मंत्र्याच्या बॉडीगार्डने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. नगर शहरातील बालिकाश्रम रोड परिसरात घडलेली ही घटना उघड होऊ नये याकरीता चोहोबाजूने दबावतंत्राचा वापर सुरू झाला आहे. दरम्यान त्या बॉडीगार्डने गर्भपात केल्याचा आरोप तरुणीने केला असून गुन्हा दाखल करण्यासाठी पीडीत मुलीने पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा याच्याकडे धाव घेतली आहे. शर्मा यांनी तोफखाना पोलीस निरीक्षकास पुढील कार्यवाहीसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
राहुरी तालुक्यातील एक विद्यार्थीनी राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी शहरात आली होती. तिला राहण्यासाठी एका निवृत्त पोलीस कर्मचार्याच्या मुलाने त्याच्या घराच्या जवळच खोली पाहून दिली. हा तरूण एका मातब्बर मंत्र्याकडे बॉडीगार्ड म्हणून कार्यरत आहे. पीडीत मुलीस लग्नाचे अमिष दाखवून त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केला. या दरम्यान ही तरुणी गरोदर राहिली. गरदोर राहिल्याचे समजताच त्याने गर्भपात करण्याचा निर्णय घेतला.
पिडीत मुलीने नकार दिल्यानंतर काही पोलीस कर्मचार्यांनी मध्यस्ती करुन पिडीत मुलीची समज काढली. त्यनंतर गर्भपात करण्यात आला. पिडीत मुलीने विवाह करण्यास गळ घातली असता बॉडीगार्ड तरुणाने मी विवाहीत असल्याचे सांगितले. त्यामुळे या तरुणाने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने या पिडीत तरुणीने पोलीस अधीक्षक शर्मा यांच्याकडे धाव घेतली आहे.
पिडीत तरुणी पोलीस ठाण्यात आली होती. तिने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत जे काही सांगितले आहे. त्याची नोंद स्टेशन डायरीला घेण्यात आली आहे. ती जर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली तर कायदेशीर तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात येईल.
:- रानेश मानगावकर ,पोलीस निरीक्षक
या प्रकरणात न्याय मिळावा या हेतूने पिडीत मुलगी तोफखाना पोलीस ठाण्यात गेली होती. तेथे तिच्यावर दबाव आणून तिला गुन्हा दाखल करण्यापासून परावृत्त करण्यात आले. काही सामाजसेवकांनी त्यासाठी मध्यस्ती केली. पिडीत मुलीस पैशाचे अमिष दाखविण्यात आले. पोलीस ठाण्यातून तिला घरी नेल्यानंतर तिला शिवीगाळ दमदाटी करुन धमकी देण्यात आली. अत्याचार झाल्याने तिने थेट पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांचे दार ठोठावले. शर्मा यांनी तिच्या तक्रारीची दखल घेत पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांना काही सूचना दिल्या आहेत. याप्रकरणी स्त्रीभ्रुणहत्येचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अत्याचार करणारा तरुण एका मंत्र्याकडे बॉडीगार्ड असून ‘एसआयपीएफ’चा जवान असल्याचे समजते आहे. त्याचे वडील पोलीस खात्यातून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. पिडीत तरुणीवर दबाव आल्यामुळे ती पोलीस ठाण्यात बेशुद्ध होऊन पडली होती. तिच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले होते. या घटनेत राजकीय हस्तक्षेप झाल्यास पिडीत तरुणीस न्याय मिळेल की नाही यात साशंकता आहे.