बीड जिल्हा राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी मा. बजरंग बप्पा सोनवणे यांची निवड झाल्यानंतर मा.ना. धनंजय मुंडे साहेब यांच्या सूचनेप्रमाणे जिल्हाध्यक्ष जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघामधे दौरा करत आहेत…
पहिल्या दौ-याची सुरुवात आष्टी, पाटोदा व शिरुर तालुक्यामधे करीत असताना गावो गावी होत असलेले स्वागत व बैठकांना मोठ्या संख्येने असलेली कार्यकर्त्यांची उपस्थिती तसेच आष्टी विधानसभा मतदार संघातील सर्वच गावांमधून दिसून येत असलेला उत्साह पाहता या मतदारसंघामधे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे न थांबणारे वादळ निर्माण झाल्यासारखे दिसून आले.. तिन्ही तालुक्यातील बहाद्दर कार्यकर्त्यांनी यापुढे कुठल्याही दबावाला बळी न पडता, सततच खोटी प्रलोभने दाखविणा-या थापाड्यांना त्यांची जागा दाखविण्याचा निर्धार केला..
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात निष्ठावान कार्यकर्त्यांची साखळी अभेद्य असल्याने समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पद्मविभूषण खा. पवार साहेब, आ. अजित दादा, खा. सुप्रियाताई, मा.ना. धनंजय मुंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली येत्या काळात ग्रामपंचीयतींसह सर्वच निवडणुकांमधे पक्षाला निर्विवाद यश मिळेल अशी खात्री आहे