नोकरी – व्यापार

नोटाबंदीः ४ महिन्यात गेल्या १५ लाख नोकऱ्या

नोटाबंदीः ४ महिन्यात गेल्या १५ लाख नोकऱ्या

महासत्ता :- काळा पैसा खणून काढण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने केलेल्या नोटाबंदीचा फटका देशातील नोकरदार वर्गांना बसला आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे अवघ्या चार महिन्यांत १५ लाख लोकांना नोकरी गमवावी लागली आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ (CMIE)ने केलेल्या एका पाहणीतून ही माहिती समोर आली आहे. ‘नोकरी करणाऱ्या एका व्यक्तीवर त्याच्या घरातील चार लोक अवलंबून असतात. त्यामुळं १५ लाख बेरोजगारांचा हिशेब केल्यास एकूण ६० लाख लोकांच्या तोंडचा घास नोटाबंदीनं हिरावून घेतला आहे, असं ‘सीएमआयई’च्या अहवालात म्हटलं आहे. ‘कंज्युमर पिरामिड हाउसहोल्ड’ या नावाखाली हा सर्वे करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर जानेवारी ते एप्रिल २०१७ या दरम्यान देशातील एकूण ४० कोटी ५० लाख नोकऱ्या राहिल्या आहेत. त्याआधी सप्टेंबर ते डिसेंबर २०१६ दरम्यान ४० कोटी ६५ लाख नोकऱ्या होत्या. त्या आधारे नोटाबंदीच्या निर्णयानंतर चार महिन्यांत जवळजवळ १५ लाख लोक बेरोजगार झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या सर्वेक्षणाअंतर्गत जानेवारी ते एप्रिल २०१६ दरम्यान तरुणांना मिळणारा रोजगार व त्यांच्या बेरोजगारीसंबंधीचे आकडे गोळा केले आहेत. हा सर्वे करताना १ लाख ६१ हजार घरातील ५ लाख १९ हजार तरुणांसोबत नोकरीसंदर्भात चर्चा केली. नोटाबंदीआधी ४० कोटी ६५ लाख लोकांकडे रोजगार होता, परंतु नोटाबंदीनंतर ४० कोटी ५० लाख लोकांकडे रोजगार राहिला आहे, असं अहवालात म्हटलं आहे.

नोटाबंदीः ४ महिन्यात गेल्या १५ लाख नोकऱ्या
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top