By
Posted on
मुंबई | हजारो शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचलण्याचा प्रताप करणाऱ्या ‘गंगाखेड शुगर’च्या रत्नाकर गुट्टेसह राज्य सरकारवर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जोरदार हल्ला केला.
साताऱ्याचे खासदार उदयनराजेंना अटक करण्याची तत्परता सरकारने दाखवली मग गुट्टेवर कारवाई करण्यास टाळाटाळ का केली जातेय, असा सवाल त्यांनी विचारला.
तसेच पत्रकार परिषद घेऊन मला धमक्या दिल्या जात आहेत. मात्र बाप जन्मी धनंजय मुंडे कुठल्या धमकीला घाबरला नाही, असंही त्यांनी म्हटलं.