गळ्यात पाटया लावून पंचनामे करता,शेतकरी तुम्हाला गुन्हेगार वाटतात का ?-धनंजय मुंडे यांचा आक्रमक
सवालगळ्यात पाटया लावून पंचनामे करता,शेतकरी तुम्हाला गुन्हेगार वाटतात का ?-धनंजय मुंडे यांचा आक्रमक सवाल
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधकांचा आक्रमक पवित्रा, विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकुब…
मुंबई दि. २७ – गळ्यात पाटया लावून पंचनामे करता,शेतकरी तुम्हाला गुन्हेगार वाटतात का अशा शब्दात विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज सरकारवर हल्लाबोल केला.
शेतकऱ्यांची कर्जमाफी,बोंडअळीचा प्रार्दुभाव,गारपीट आणि धर्मा पाटील यांची आत्महत्या या प्रश्नावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेमध्ये स्थगन प्रस्ताव मांडून चर्चा करण्याची मागणी केली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक होताना धनंजय मुंडे म्हणाले की १७ जिल्हयात दौरा केला, एकही कर्जमाफी झालेला शेतकरी भेटला नाही.डिसेंबरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये जाहीर केलेली बोंडअळीची नुकसान भरपाई मिळालेली नाही.गारपीटीची नुकसान भरपाई मिळालेली नाही. धर्मा पाटील यांना मृत्यू नंतर हि न्याय मिळाला नाही. शेतक-यांना मदत करणे तर दूरच त्यांच्या गळ्यात पाट्या लावून पंचनामे मात्र सुरु आहेत,शेतकरी तुम्हाला गुन्हेगार वाटतात का? असा हल्लाबोल केला. गारपिटीत शेतकऱ्यांनी पशुधन गमावले. शासनाचे अधिकारी म्हणतात कोंबड्या दगावल्या असतील तर त्याचे शवविच्छेदन करा. इतका तुघलकी निर्णय सरकार कसे काय घेऊ शकते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या वेळी झालेल्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज सुरुवातीला 20 मिनिटे आणि नंतर दिवासभारासाठी तहकुब करण्यात आले.
——————–
