बीड , ज्ञानेश्वर बडे :- गहिनीनाथ गड आणि ब्लॅकमेलिंग प्रकरणाची चर्चा रविवारी दिवसभर जिल्ह्यात होत राहिली. गड आणि स्वत: गडाचे मठाधिपती अडचणीत आले असल्याचा दूरध्वनी पोलीसांना स्वत: मठाधिपती विठ्ल महाराज यांनी केला आणि खळबळ उडाली. परंतु या निमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. मठाधिपतीनी यापूर्वी दोन वेळा पाच/ पाच लाख रूपये दिले. पोलीसांनी हे पैसे का दिले असा प्रश्न केल्यानंतर महाराजांनी गडाची बदनामी नको म्हणून पाच लाखाचा नैवेद्य दाखविला असल्याचे सांगितल्याची माहिती आता समोर आली आहे. महाराजांनी ब्लॅकमेकर्संना यापूर्वी दिलेले दहा लाख का दिले आणि त्या क्लिपमध्ये असे काय होते की ज्यामुळे गडाची बदनामी होणार होती, याचाही उलगडा आता या निमित्ताने झाला पाहिजे. महाराजांनी हे पैसे स्वत: जवळचे दिले की गडाच्या तिजोरीतून दिले हे सुध्दा आता लोकांच्या समोर येणे आवश्यक आहे.
बदनामी करण्याची भीती दाखवून पैसे उकळणाऱ्या या रॅकेटची पालेमुळे तर पोलीस नक्कीच खंदून काढतील परंतु याचवेळी सहजपणाने दहा-दहा लाखाचा नैवेद्य दाखविणाऱ्या महाराजांच्या औदार्याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी गडाचे भक्त करू लागले आहेत. बीड जिल्ह्यात गड हे पावित्र्याचे आणि लोकांच्या श्रध्देची ठिकाणे आहेत. ते अबाधित राखण्याचे काम गडाच्या महंतांनी करणे आवश्यक आहे.
या सर्व गोष्टीच्या मुळापर्यंत पोलिसांनी गेले पाहिजे, कारण असा प्रकार भगवान गड, गहिनाथ गड, तारकेश्वर गड, हनुमान गड या प्रत्येक ठिकाणी घडत आहे, बहुजनांची ही शक्तीस्थळे तिथल्या मठाधीपतीना बदनाम करून आपल्या राजकीय पोळ्या भाजण्याचा काही मनुवादी नेत्यांचा डाव आहे का? हे ही पोलिसांनी तपासलं पाहिजे . राज्याचे विरोधी पक्षनेते ना.धनंजयजी मुंडे साहेब यांनी याची विधानपरिषदेत सखोल चौकशीची मागणी करावी व सत्य जनतेसमोर आणावे ही मागणी परिसरातून होत आहे.
By
Posted on