वंजारी समाजाने धनंजय मुंडे यांच्याकडे आशेचा किरण म्हणून पाहण्यास सुरवात केली.समाजातील सामन्यातील सामान्य प्रश्न,लग्न समारंभ ,युवकांचे शैक्षणिक प्रश्न ,सुख,दुःख,आडी अडचणीला धावून येतात याची जाण समाजातील तळागाळातील लोकांना होत आहे.जी लोक पूर्वी विरोध करत होते ते आज सन्मान करण्यासाठी पुढे येत आहेत.आज सत्ता नसतानाही युवक-युवती त्यांना आपला नेता मानत आहेत.असेच समीकरण गोपीनाथ मुंडे यांच्या बाबतीत होते.तेच पुढे धनंजय मुंडे यांच्या बाबतीत होताना दिसत आहे .ऐढेच नाही तर समाजातील जीव ओवाळून टाकणारे युवक तयार होत आहेत.आता वंजारी समाजाचा नेता धनंजय मुंडे प्रमाणे सर्वसामान्यपर्यंत पोहचणार असावा अशी समाजातील लोकांची प्रतिक्रिया समोर येत आहे.
धनंजय मुंडे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे राजकारण जवळून पहिले आहे .धनंजय मुंडे यांचे वक्तृत्व आणि संयमी वृत्ती यामुळे वंजारी समाजातील युवक मोठ्या प्रमाणावर जोडले जात आहेत.भविष्यात समाजाचे नेतृत्व धनंजय मुंडे यांच्याकडे असावे असे समाजात चर्चा दिसून येत आहे.
By
Posted on