By
Posted on
सोलापूर : टेंभुर्णी येथील वेश्या व्यवसाय करणा-या सुमित हॉटेलवर सोलापूर ग्रामीण टीमने धाड टाकून पराज्यातील 5 महिलांची सुटका केली.
सोलापूर-पुणे महामार्गावरील या हॉटेलवर सात वाजण्याच्या सुमारास धाड टाकण्यात आली. याप्रकरणी हॉटेलचे मालक तसेच भाजपचे तालुकाध्यक्ष संजय कोकाटे यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार सुमित हॉटेलवरील 5 महिलांची सुटका करून, आरोपींविरुध्द अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 चे कलम 3, 4, 5 आणि 6 अन्वये टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.