अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाल्यानंतर बराक ओबामा यांना १ कोटी ४० लाख रूपये पेन्शन मिळणार आहे. मात्र त्याचबरोबर कमाई करण्याचे अनेक मार्ग त्यांना उपलब्ध आहेत. त्यातील कोणता मार्ग ओबामा स्वीकारतील याची चर्चा रंगू लागली आहे. अमेरिकन युनिर्व्हसिटी सेंटर फॉर काँग्रेशनल अॅन्ड प्रेसिडेन्शियल स्टडीजचे संचालक जेम्स थर्बर यांच्या मते ओबामा फक्त पुस्तके लिहून ३०० कोटींची कमाई करू शकतील. यापूर्वी ओबामांनी २००९ मध्ये लिहिलेल्या द ऑडेसिटी ऑफ होप व ड्रीम्स फ्रॉम माय फादर या दोन पुस्तकातून ३१ कोटींची कमाई केली आहे. ओबामांची ही दोन्ही पुस्तके लोकप्रिय ठरली आहेत.
कांही जणांच्या म्हणण्यानुसार ओबामा व मिशेल यांना कुठेलाही पुस्तक कंत्राटदार ते पुस्तके लिहिणार असतील तर २० ते ४५ मिलीयन डॉलर्स म्हणजे २८४ कोटी रूपये देण्यास तयार होईल. ओबामांनी मागेच त्यांना लिहायला आवडते असे सांगितले होते. ओबामा यांना लेक्चररशीपचा अनुभव आहे त्यामुळे त्यांना लॉ विद्यापीठात चांगला जॉब मिळू शकतो. ते बिल क्लींटनप्रमाणे एखादे फौंडेशन सुरू करू शकतात अथवा अन्य अमेरिकन अध्यक्षांप्रमाणे पब्लीक स्पीच देऊन चांगली कमाई करू शकतात. त्यांना एका स्पीचसाठी अडीच लाख डॉलर्स मिळू शकतील असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.
आणखी एक मार्ग म्हणजे ते बास्केटबॉल टीम खरेदी करू शकतात. ओबामा स्वतः बास्केटबॉल प्लेअर आहेत आणि हा खेळ त्यांना अतिशय आवडतो. त्यांनी मागे एकदा मुलाखतीत बास्केटबॉल टीम (एनबीए) विकत घ्यायचे स्वप्त बोलून दाखविले होते. अर्थात अशी टीम विकत घेण्यासाठी ७ हजार कोटी रूपयांची गरज आहे मात्र ओबामा अशा टीम घेणार्या ग्रुपचा हिस्सा बनू शकतात.