25 जानेवारी : देशाच्या सर्वोच्च अशा पद्म पुरस्कारांची आज घोषणा झालीये. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. त्यांच्यासह भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांनाही याच सन्मानाने गौरवण्यात आलंय.
दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्काराची केंद्र सरकारने यादी जाहीर केलीये. पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्काराची घोषणा करण्यात आलीये. महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कारने सन्मान करण्यात आलाय. तसंच भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनाही याच सन्मानाने गौरवण्यात आलंय.मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुंदरलाल पटवा यांना मरणोत्तर पद्मविभूषण देण्यात येणार आहे. त्यासोबतच जमू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद, लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए.संगमा यांनाही मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे.
ज्येष्ठ गायक के. जे. येसुदास आणि ज्येष्ठ शास्त्रीय संगीतकार आणि मोहनवीणेमुळे प्रख्यात असलेले शास्त्रीय संगीतकार विश्वमोहन भट यांनाही पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांमध्ये यावर्षी राजकीय आणि संगीत क्षेत्रातल्या मान्यवरांची पद्मविभूषण पुरस्कारासाठी निवड झालीय.
‘पद्मविभूषण’ पुरस्काराचे मानकरी
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
- मुरली मनोहर जोशी, ज्येष्ठ भाजप नेते
- सुंदरलाल पटवा (मरणोत्तर पद्मविभूषण), मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते
- के. जे. येसुदास, ज्येष्ठ गायक
- पं. विश्वमोहन भट, मोहनवीणावादनामुळे जगविख्यात झालेले शास्त्रीय संगीतकार
पद्मश्री पुरस्कार यादी
- विराट कोहली (क्रिकेट)
- साक्षी मलिक महिला (कुस्तीपटू)
- दीपा कर्माकर (जिम्नॅस्ट)
- श्रीजेश (हॉकी)
- विकास गौडा (अॅथलिट)
- भावना सोमय्या (फिल्म समीक्षक)
- सी. नायर (नर्तक)
- अनुराधा पौडवाल (गायिका)
- कैलाश खेर (गायक)
- संजीव कपूर (शेफ)
‘पद्मभूषण’ पुरस्काराचे मानकरी
- चो. रामास्वामी, ज्येष्ठ पत्रकार
- विश्वमोहन भट, मोहनवीणा वादक
