धनंजय मुंडे माझा कट्टावरील महत्त्वाचे मुद्दे:
भाजपने आमच्या नेत्यांवर केलेले आरोप अद्याप सिद्ध झालेले नाहीत : धनंजय मुंडे
मी विधानसभेच्या निवडणुकीत पडल्यानंतर मला वाटलं नव्हतं की, पक्ष माझ्यावर पुन्हा काही जबाबदारी देईल: धनंजय मुंडे
आधी विरोधी पक्षातला काम करण्याचा अनुभव असल्यानं मला पद देण्यात आलं: धनंजय मुंडे
जनतेच्या प्रश्नासंबंधी लढताना समोर कोण आहे हे कधी मनात आलं नाही यापुढेही येणार नाही: धनंजय मुंडे
भुजबळसाहेब जेलमध्ये गेल्यानं नाशिक जिल्ह्यात थोडासा परिणाम झाला आहे. हे मान्य: धनंजय मुंडे
मी स्वत: पक्ष सोडला नाही, मला पक्षानं बाजूला सारलं, त्यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलो: धनंजय मुंडे
भाजपमध्ये मी कार्यकर्ता म्हणून 10 वर्ष काम केलं होतं, त्यामुळे माझं नेतृत्व लादलेलं नाही: धनंजय मुंडे
पंकजा, प्रीतम मुंडे यांचं नेतृत्व लादलेलं आहे की नाही याबाबत मी काहीही बोलणार नाही: धनंजय मुंडे
विधानसभा निवडणुकीत माझा अवघ्या 20 हजार मतांनी पराभव झाला: धनंजय मुंडे
मुंडे साहेबांची साथ सोडण्याची इच्छा नव्हती: धनंजय मुंडे
पंकजांसोबत तसं काही नातं राहिलेले नाही, हे दुर्दैव आहे: धनंजय मुंडे
नातं हे नातं राहिलंच पाहिजे, या मताचा मी आहे. राजकारण वेगळं आणि नातं वेगळं: धनंजय मुंडे
भाजपमध्ये परत जाणार नाही, मी इथं खूश आहे: धनंजय मुंडे
पंकजा मुंडेंना क्लीनचीट मिळलेली असली तरीही त्यांनी चिक्की घोटाळा केला यावर मी ठाम आहे: धनंजय मुंडे
चिक्की घोटाळ्याचे सर्व पुरावे मी सभागृहात सादर केले आहेत: धनंजय मुंडे
22 हजारांचं बील असलेल्या कारखान्यात कोट्यवधीची चिक्की तयार होतेच कशी?: धनंजय मुंडे
माझ्या काहीही आकांक्षा नाहीत. पक्ष जी जबाबदारी देणार ती पार पाडू: धनंजय मुंडे
राजधर्म जिथं पाळायचा असतो तिथं नातं समोर येत नाही: धनंजय मुंडे
भाजपशी कसलंही साटंलोटं नाही: धनंजय मुंडे
मोठ्या मनानं काम केलं तर फायदा होतोच: धनंजय मुंडे
मुंडे साहेबांनंतर मराठवाड्यात नेतृत्वाची पोकळी आहे: धनंजय मुंडे
मुंबई: ‘पंकजा मुंडेंसोबत आता काही नातं राहिलेलं नाही. हे दुर्दैव आहे पण ही खरी गोष्ट आहे. राजकारण वेगळं आणि नातं वेगळं. राजकारणापलीकडं नातं राहावं या मताचा मी आहे.’ असं मत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलं. एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’वर बोलताना त्यांनी अनेक प्रश्नांची रोखठोक उत्तरं दिलं.
‘राजकारण वेगळं आणि नातं वेगळं’
‘पंकजा मुंडेंसोबत आता काही नातं राहिलेलं नाही. हे दुर्दैव आहे. नातं व्हावं निखळ असावं अशी माझी इच्छा आहे. राजकारण वेगळं आणि नातं वेगळं. राजकारणात नातं आणू नये आणि नात्यात राजकारण या मताचा मी आहे. भाजप मी सोडलं नव्हतं. तर आम्हाला बाजूला सारण्यात आलं. भगवानगडावरुन मुंडेसाहेब म्हणाले होते की, आजपासून माझं माझ्या भावाशी असलेलं नातं संपलं. त्यानंतर माझ्या वडिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. म्हणून आम्ही भाजप सोडली.’ असं म्हणत धनंजय मुंडेंनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली.
‘चिक्की घोटाळा झाला यावर मी आजही ठाम’
पंकजा मुंडेंना क्लीनचीट मिळलेली असली तरीही त्यांनी चिक्की घोटाळा केला यावर मी ठाम आहे. चिक्की घोटाळ्याचे मी सर्व पुरावे सभागृहात सादर केले आहेत. 22 हजारांचं बील असलेल्या कारखान्यात कोट्यवधीची चिक्की तयार होतेच कशी. असा सवालही त्यांनी उपस्थिती केला.
‘मुंडे साहेबांची साथ सोडण्याची माझी इच्छा नव्हती’
‘मुंडे साहेबांची साथ सोडण्याची माझी इच्छा नव्हती. भाजपमध्ये मी कार्यकर्ता म्हणून 10 वर्ष काम केलं होतं, त्यामुळे माझं नेतृत्व लादलेलं नाही. पंकजा, प्रीतम मुंडे यांचं नेतृत्व लादलेलं आहे की नाही याबाबत मात्र, मी काहीही बोलणार नाही. विधानसभा निवडणुकीत माझा अवघ्या 20 हजार मतांनी पराभव झाला. याला मी काही पराभव मानत नाही.’ असं धनंजय मुंडे म्हणाले.
‘मला वाटलं नव्हतं की पक्ष पुन्हा माझ्यावर काही जबाबदारी सोपवेल’
‘मी विधानसभेच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर मला वाटलं नव्हतं की, पक्ष पुन्हा माझ्यावर काही जबाबदारी देईल. पण याआधी मी भाजपमध्ये विरोधी पक्षात काम केलं होतं. त्याचा मला अनुभव होता. त्यामुळेच माझ्यावर विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी सोपावण्यात आली.’ असं धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलं.
‘पुन्हा भाजपत जाण्याची इच्छा नाही’
‘माझ्या काहीही आकांक्षा नाहीत. पक्ष जी जबाबदारी देईल ती आपण समर्थपणे पार पाडू. माझी पुन्हा भाजपत जाण्याची इच्छा नाही. मी जिथं आहे तिथं सुखी आहे. मोठ्या मनानं काम केलं तर नक्कीच फायदा होतो’ असंही धनंजय मुंडे म्हणाले.