जनतेच्या मनातील नायक ना.धनंजय मुंडेंच !
_परळी मतदारसंघातील जि.प.पं.स निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडीचाच झेंडा_
*भाजपाला नगरपालिके पाठोपाठ पुन्हा धोबीपछाड; जिल्हा परिषदेच्या दहा पैकी आठ जागांवर विजय; परळी, अंबाजोगाई पंचायत समितीही राष्ट्रवादीकडे*
*परळीत चार महिन्यात पुन्हा तिसर्यांदा दिवाळी; जनतेच्या विश्वासाचा विजय-ना.धनंजय मुंडे*
परळी वै.दि.23…………जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांना खलनायक ठरवणार्या भाजपाला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना परळी विधानसभा मतदारसंघातील जनतेने आज चोख उत्तर देत ना.धनंजय मुंडे हेच आमच्या मनातील नायक आहेत हे मतपेटीतुन दाखवुन दिले आहे. परळी नगरपालिके पाठोपाठ जि.प.पं.स च्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसने ऐतिहासीक विजय प्राप्त करीत भाजपाला पुन्हा एकदा धोबीपछाड दिली आहे. परळीत नो सि.एम. नो पि.एम. ओन्ली डि.एमचा नारा देत येथील जनतेने मतदारसंघातील दहा पैकी तब्बल आठ जागांवर दणदणीत मतांनी विजयी केले आहे. जिल्हा परिषदेचे बरोबरच परळी आणि अंबाजोगाई पंचायत समितींवरही राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे.
संपुर्ण राज्याचे लक्ष लागुन राहिलेल्या जि.प.पं.स च्या निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने अभुतपुर्वक आणि ऐतिहासीक यश प्राप्त केले आहे. मतदारसंघात येणार्या दहा जागां पैकी आठ जागांवर राष्ट्रवादी काँगे्रस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार प्रचंड मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. परळी पंचायत समितीच्या बारा पैकी आठ जागांवर विजय मिळवत स्थापनेनंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवला आहे. अंबाजोगाई पंचायत समितीच्या बारा पैकी राष्ट्रवादी काँग्रेसने सात व काँग्रेसने दोन अशा नऊ जागा मिळवुन हि पंचायत समितीही काबीज केली आहे.
*अजय मुंडेंचा दणदणीत विजय*
आज सकाळी मतमोजणीला सुरूवात होताच पहिल्यापासुनच राष्ट्रवादी काँग्रेस व आघाडीच्या सर्व उमेदवारांनी निर्णायक आघाडी घेतली होती. पिंप्री या जिल्हा परिषद गटातुन आघाडीचे उमेदवार तथा राष्ट्रवादी युवकचे प्रदेश उपाध्यक्ष अजय मुंडे यांनी भाजपा उमेदवार रामेश्वर मुंडे यांचा तब्बल 2733 मतांनी दारून पराभव केला. जिरेवाडी जिल्हा परिषद गटात आघाडीच्या उमेदवार कौसाबाई बबनदादा फड यांनी भाजपाच्या सौ.अर्चना श्रीराम मुंडे यांचा 2526 मतांनी पराभव केला. वडगांव गटातुन आघाडीच्या सो.रेखाबाई मधुकर आघाव यांनी भाजपाच्या सौ.कुशावर्ताबाई विठ्ठलराव तांदळे यांचा 1145 मतांनी पराभव केला. सिरसाळा गटातुनही आघाडीच्या सौ.अश्विनी धम्मपाल किरवले यांनी भाजपाच्या पंचशिला किरवले यांचा 323 मतांनी पराभव केला. धर्मापुरी गटात काँग्रेसच्या सौ.आशाबाई संजय दौंड यांनी भाजपाच्या सौ.शोभा विनायक गुट्टे यांच्या पेक्षा तब्बल 2791 मते जास्त घेतली. नागापुर गटातुन काँग्रेसचे प्रदिप त्रिंबकराव मुंडे हे ही 1194 मतांनी विजयी झाले.
*परळी पंचायत समितीवरही आघाडीचा झेंडा*
परळी तालुका स्थापनेपासुन प्रथमच पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला असुन, बारा पैकी आठ जागांवर आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. सिरसाळा गणातुन जानिमियाँ कुरेशी हे 93 मतांनी विजयी झाले, पांगरी गटातुन सौ.मिराबाई वसंत तिडके ह्या आघाडीच्या उमेदवार तब्बल 2055 मतांनी विजयी झाल्या आहेत. मांडवा गणातुन सटवाजी फड हे 664 मते तर नागपुर मधुन सौ.कल्पना मोहन सोळंके ह्या 918 मतांनी विजयी झाल्या. मोहा गणातुन माकपाच्या सौ.रेखा सुदाम शिंदे ह्या 1272 मतांनी विजयी घोषीत करण्यात आल्या तर टोकवाडी गणातुन बालाजी प्रभु मुंडे हे 1989 ऐवढे विक्रमी मताधिक्य घेवुन विजयी झाले आहेत. जिरेवाडी गणातुन सौ.सुषमा ज्ञानोबा मुंडे ह्या 35 मतांनी तर नंदागौळ गणातुन सौ.उर्मीला शशिकांत गित्ते ह्या 2275 मतांनी विजयी झाल्या आहेत. आघाडीचे धर्मापुरी, पोहनेर, पिंप्री व वडगांव दादाहरी गणाच्या उमेदवारांचा अतिशय अल्पशा मतांनी पराभव झाला.
*अंबाजोगाई तालुक्यातही राष्ट्रवादीचाच बोलबाला*
अंबाजोगाई तालुक्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचाच बोलबाला राहिला. घाटनांदुर जिल्हा परिषद गटातुन सौ.शिवकन्या शिवाजी सिरसाट ह्या प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या, घाटनांदुर गणातील पंचायत समितीचे उमेदवार मच्छिंद्र वालेकर, जवळगाव गणाचे रखमाजी सावंत, उजणी गणाच्या सौ.मिना शिवहार भताने, सायगांव गणाच्या पटेल अलिशान समिर विजयी झाल्या आहेत. पाटोदा गटातुन काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख विजयी झाले असुन, तालुक्यातील बारा पैकी सात पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकल्याने हि पंचायत समितीही राष्ट्रवादीच्या ताब्यात आली आहे.
*परळीत एकच जल्लोष*
सकाळी 10 वाजल्यापासुन निवडणुकांचे निकाल जाहिर होऊ लागताच परळीत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करण्यास सुरूवात केली होती. तहसिल कार्यालया बाहेर आणि ना.धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालय व पंढरी निवासस्थानी गुलालाची उधळन, फटाके व तोफांची अतिषबाजी आणि बँन्डच्या दणदणाटाने परळीत पुन्हा दिवाळीचे वातावरण निर्माण झाले. निकालानंतर ना.मुंडे तहसिल कार्यालयात येताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीने संपुर्ण परिसर दणाणुन सोडला. ना.मुंडे, काँग्रेसचे नेते प्रा.टि.पी.मुंडे, बाबुराव मुंडे, संजय दौंड, नगराध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे व पदाधिकार्यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन व मतदारांचे आभार व्यक्त केले.
*जनतेच्या विश्वासाचा विजय-ना.धनंजय मुंडे*
या निवडणुकीतील आघाडीच्या? उमेदवारांचा विजयी सुरूवातीपासुनच निश्चित होता. भाजपाने साम,दाम,दंड,भेद आणि सत्तेचा वापर करूनही जनतेने त्यांना स्पष्टपणे नाकारले आहे. जनतेशी प्रामाणिकपणे आम्ही केलेली सेवा त्यांच्या अडीअडचणी व सुख, दुःखात सहभागी होणे आणि विकास केवळ आम्हीच करू शकतो हा विश्वास त्यांच्या मनात निर्माण झाल्यामुळेच हा विजयी झाल्याचे सांगत ना.मुंडे यांनी जनतेचे आभार व्यक्त करून दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवु असे आश्वासन दिले.
*अण्णांच्या आठवणींने ना.मुंडे गहिवरले*
विजयानंतर ना.मुंडे यांनी विजयी उमेदवारांसह स्व.पंडितअण्णा मुंडे यांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांचे दर्शन घेतले. माध्यमांशी बोलतांना स्व.अण्णांच्या आठवणींने त्यांना गहिवरून आले होते. हा विजय पाहण्यास अण्णा हवे होते हे सांगताना त्यांचे डोळे पानावले होते.
*राजीनाम्या पेक्षा आत्मपरिक्षण करा-ना.धनंजय मुंडे*
या पराभवामुळे आपण राजीनामा देत असल्याच्या भाजपा मंत्र्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ना.मुंडे म्हणाले की, पराभवामुळे कोणी राजीनामा द्यावा कि न द्यावा हा ज्याचा, त्याचा व्यक्तीगत प्रश्न आहे. राजीनामा देण्यापेक्षा सत्ता असतांनाही जनतेने का नाकारले याचे आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला देतानाच आपण जनतेच्या मनात स्वतःसाठी पद निर्माण करत नाही तर जनतेच्या मनात विश्वासाचे नाते निर्माण केल्यामुळेच जनतेने आपल्याला स्विकारल्याचे साांगितले. यापुढे तरी निवडणुका सहानुभुतीच्या नव्हे तर विकासाच्या राजकारणावर लढवण्याची हिंमत भाजपा नेतृत्वाने दाखवावी असे आव्हानही त्यांनी दिले.
*परळीत चार महिन्यात तिसर्यांदा दिवाळी*
नोव्हेंबर महिन्यात झालेल्या दिवाळीच्या पाठोपाठ नगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयानंतर परळीत अभुतपुर्व दिवाळी साजरी झाली होती. चारच महिन्यात आज तिसर्यांना पुन्हा परळीकरांना दिवाळीचे वातावरण पाहण्यास मिळाले.
———————————————