MeToo मोहीम : विनता नंदाविरोधात आलोक नाथ यांचा मानहानीचा दावा.
प्रसिद्ध दिग्दर्शक-निर्मात्या विनता नंदा यांनी अभिनेते आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेला आहे. विनता नंदा यांच्या आरोपानंतर आलोक नाथ यांनी कायद्याचा आधार घेत विनता नंदा यांच्याविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे.
20 वर्षांपूर्वी बॉलिवूड व टीव्हीच्या दुनियेतील ‘सर्वात संस्कारी अभिनेत्याने’ माझ्यावर बलात्कार केल्याचा आरोप विनता नंदा यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केला. विनता नंदा यांच्या पोस्टनंतर काही अभिनेत्री आणि महिलांनीही आलोक नाथ यांच्यावर गैरवर्तणुकीचे आरोप केले. या प्रकरणामुळे मानहानी झाल्याचं म्हणत आलोक नाथ यांनी विनता नंदाविरोधात न्यायालयामध्ये मानहानीचा दावा केला आहे.