महाराष्ट्र

आहिरांच्या शिवसेना प्रवेशावर अजित पवार संतापले आणि म्हणाले…

मुंबई | राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती मिळाल्यावर , यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘काही लोकांना आमदार न झाल्यास राजकारणच करता येत नाही, त्यामुळे ते असा निर्णय घेतात,’ असा टोला अजित पवार यांनी सचिन अहिरांना लगावला आहे.

‘काही लोकांना आमदार झालो नाही तर राजकारण करता येत नाही. यामुळे काहीजण काही निर्णय घेतात. राजकारणात हे घडत राहतं,’ असं म्हणत अजित पवार यांनी सचिन अहिरांवर निशाणा साधला आहे. अजित पवारांनी अप्रत्यक्ष पणे अहिर यांच्यावर टीका केली आहे.

‘सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जास्त सांगू शकतील. अहिर आणि जयंत पाटील निकटवर्तीय आहेत. त्यामुळेच अजित पवार यांनी जयंत पाटीलांकडे बोट दाखवल्याचं दिसत आहे.

सचिन अहिर यांचा शिवसेना प्रवेश राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का असणार आहे. कारण अहिर हे राष्ट्रवादीचा मुंबईतील प्रमुख चेहरा होते. तसंच ते माजी मंत्रीही राहिले आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादीला मुंबईत मोठी गळती लागु शकते असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

Most Popular

To Top