विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या मागनीमुळे ;रब्बी पीक विम्याचा हप्ता भरण्यास 10 दिवसांची मुदतवाढ.
मुंबई दि.31 – रब्बी हंगाम 2016-17 साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा हप्ता ( प्रीमियम) भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी या विधान परिषद विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांच्या मागणीला यश आले असून प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत प्रीमियम भरण्यास 10 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत रब्बी प्रीमियम भरण्याची 31 डिसेंबर ही अंतीम मुदत ठरवण्यात आली होती. मात्र नोटा बंदीच्या निर्णयामुळे शेतक-यांकडे पैसे उपलब्ध नाहीत त्यामुळे या योजनेपासून राज्यातील हजारो शेतक-यांना वंचित राहावे लागणार होते त्यामुळे विमा भरण्यास एक महीण्याची मुदतवाढ देण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी 28 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री यांना एक पत्र पाठवून केली होती. याबाबत 10 दिवस मुदतवाढ देण्यात येत असल्याबाबत केंद्रीय कृषी मंत्रालयाचे एक प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. त्यामुळे पीक विमा भरण्यास 10 दिवसांची मुदतवाढ मिळाली असून 10 जानेवारी पर्यंत विमा भरता येणार आहे. या बाबत राज्य सरकारनेही राज्यातही या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी हि मुंडे यांनी केली आहे. तसेच हि मुदत अल्प असून एक महिना मुदतवाढीची आपली मागणी कायम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.