महाराष्ट्र

महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलं

महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलं

महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलं.

10 महापालिकेसाठी 21 फेब्रुवारीला मतदान

मुंबई : राज्यात होणाऱ्या 10 महानगरपालिका आणि 26 जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांची आज घोषणा होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद होणार आहे. त्यामध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल.

महापालिका आणि जिल्हा परिषदेची मतमोजणी 23 फेब्रुवारीला

21 फेब्रुवारीला महापालिकांसाठी मतदान

जिल्हा परिषद – दुसरा टप्पा 21 फेब्रुवारी

जिल्हा परिषद – पहिला टप्पा 16 फेब्रुवारी

सर्व दहा महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार

जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या टप्प्यात दहा जिल्ह्यांच्या निवडणुका

जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार, पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यांच्या निवडणुका

औरंगाबाद, जालन, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, गडचिरोली, जळगाव,

मार्च-एप्रिलमध्ये दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा, वेळापत्रक ठरवताना त्याचाही विचार

10 मनपांची मुदत 4 मार्चला संपणार

दहा महापालिकांची मुदत चार मार्चला संपणार

——————

 

मुंबई : राज्यात होणाऱ्या 10 महानगरपालिका आणि 26 जिल्हा परिषद निवडणुकांच्या तारखांची आज घोषणा होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाची आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद होणार आहे. त्यामध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येईल.

*दहा महापालिका

1. मुंबई
2. पुणे
3. पिंपरी चिंचवड
4. ठाणे
5. उल्हासनगर
6. नाशिक
7. नागपूर
8. अकोला
9. अमरावती
10. सोलापूर

 

*25 जिल्हा परिषद

1. रायगड
2. रत्नागिरी
3. सिंधुदुर्ग
4. पुणे
5. सातारा
6. सांगली
7. सोलापूर
8. कोल्हापूर
9. नाशिक
10. जळगाव
11. अहमदनगर
12. अमरावती
13. बुलढाणा
14. यवतमाळ
15. औरंगाबाद
16. जालना
17. परभणी
18. हिंगोली
19. बीड
20. नांदेड
21. उस्मानाबाद
22. लातूर
23. वर्धा
24. चंद्रपूर
25. गडचिरोली

दरम्यान, महापालिका आणि जिल्हापरिष निवडणुका फेब्रुवारी महिन्यातच होणार असल्याचं राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. मार्च महिन्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा असल्यानं निवडणुका फेब्रुवारीत घेण्यात येणार असल्याचं सहारिया यांनी स्पष्ट केलं आहे. निवडणूक आयोगाने त्यासाठी तयारीही पूर्ण केल्याची माहिती त्यांनी दिली.

 

निवडणुकांचे बिगुल येत्या काही दिवसात वाजत असले, तरी शिवसेना, भाजप, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांच्यात युती-आघाडी होण्याबाबत कुठलाही ठोस निर्णय अद्याप झालेला नाही.

 

दहा महानगरपालिकेतले सध्याचे पक्षीय बलाबल

1) मुंबई – एकूण सदस्य संख्या – 227
सत्ता – शिवसेना-भाजप युती
शिवसेना – 75
भाजप – 31
काँग्रेस – 52
राष्ट्रवादी काँग्रेस – 13
मनसे – 28
समाजवादी पार्टी – 9
अखिल भारतीय सेना – 2
भारिप – 1
रिपाइं – 1
अपक्ष – 15

2) ठाणे – एकूण सदस्य संख्या – 130
सत्ता – शिवसेना-भाजप युती
यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग, त्यानुसार एकूण 33 प्रभाग असतील म्हणजेच 131 सदस्य निवडून येतील.
शिवसेना – 57
भाजप – 8
काँग्रेस – 13
राष्ट्रवादी – 30
मनसे – 7
अपक्ष – 15

3) उल्हासनगर – एकूण सदस्य संख्या – 78
सत्ता – शिवसेना-भाजप युती
यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 20 प्रभाग असतील म्हणजेच 78 सदस्य निवडून येतील. (2 प्रभागात 3 उमेदवार)
शिवसेना – 20
भाजप – 11
आरपीआय – 4
साई – 7
बसपा – 2
राष्ट्रवादी काँग्रेस – 8
काँग्रेस – 20
अपक्ष – 6

4) पुणे – एकूण सदस्य संख्या -156
सत्ता – राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी
यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 41 प्रभाग असतील म्हणजेच 162 सदस्य निवडून येतील.
राष्ट्रवादी – 54
काँग्रेस – 29
मनसे – 28
शिवसेना – 15
भाजप – 26
आरपीआय – 2

5) पिंपरी – एकूण सदस्य संख्या – 128
सत्ता – राष्ट्रवादी
यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 32 प्रभाग असतील म्हणजेच 128 सदस्य निवडून येतील.
राष्ट्रवादी – 83
शिवसेना – 15
काँग्रेस – 12
मनसे – 4
भाजपा – 3
आरपीआय – 1
अपक्ष – 9

6) सोलापूर – एकूण सदस्य संख्या – 102
सत्ता – काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी
यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 26 प्रभाग असतील म्हणजेच 102 सदस्य निवडून येतील. (24 आणि 3 सदस्यांचे दोन प्रभाग)
काँग्रेस – 44
राष्ट्रवादी – 14
भाजप – 26
शिवसेना – 10
बसपा – 3
माकपा – 3
आरपीआय – 1
अपक्ष – 1

7) नाशिक – एकूण सदस्य संख्या – 122
सत्ता – मनसे-अपक्ष-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी
यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 31 प्रभाग असतील म्हणजेच 122 सदस्य निवडून येतील. (29 प्रभाग 4 सदस्यांचे आणि 2 प्रभाग 3 सदस्यीय असणार)
मनसे – 39
शिवसेना-रिपाइं – 22
काँग्रेस – 16
भाजपा – 14
राष्ट्रवादी – 20
माकप – 3
अपक्ष – 6
जनराज्य – 2

8) नागपूर – एकूण सदस्य संख्या – 145
यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 38 प्रभाग असतील म्हणजेच 151 सदस्य निवडून येतील. (एक प्रभाग 3 चा असेल.)
सत्ता – भाजप
भाजप – 63
काँग्रेस – 41
शिवसेना – 6
राष्ट्रवादी – 6
बसपा – 12
मनसे – 2
मुस्लीम लीग – 2
अपक्ष – 13

9) अकोला – एकूण सदस्य संख्या – 73
सत्ता – सेना-भाजप युती
यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 20 प्रभाग असतील म्हणजेच 80 सदस्य निवडून येतील.
भाजप – 18
काँग्रेस – 18
शिवसेना – 8
भारिप-बमसं – 8
राष्ट्रवादी – 5
शहर सुधार समिती – 3
यूडीएफ – 2
समाजवादी पक्ष – 1
मनसे – 1
अपक्ष – 9

10) अमरावती – एकूण सदस्य संख्या – 87
सत्ता – काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी
यंदाच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच चार सभासदांचा एक प्रभाग. एकूण 21 प्रभाग असतील म्हणजेच 87 सदस्य निवडून येतील. (एक प्रभाग 3 चा असेल.)
भाजप – 7
शिवसेना – 11
राष्ट्रवादी – 18
काँग्रेस – 25
बसपा – 6
जनविकास काँग्रेस – 6
जनविकास आघाडी – 7
आरपीआय (अ) – 2
आरपीआय (ग) – 1
इतर – 444t

महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलं
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top