निफाड : डाळींबाला बाजारपेठेत भाव नाही. गेल्या दोन वर्षांपासून सतत तोटाच सहन करतोय यामुळे कर्जाचा डोंगर उभार राहू लागला आहे.
त्यामुळे १ जूनपासून संपावर जाणार असून या संपत सहभागी होण्यासाठी तीन एकर डाळींबाची बाग तोडली. उत्पादन खर्चसुद्धा निघाला नसल्याची खंत या उच्चशिक्षित शेतकऱ्याने व्यक्त केली.
दीक्षी येथील पदवीधर शेतकऱ्याने आज तीन एकर डाळींब बाग तोडली. पुढच्या वर्षीही पाच एकर उर्वरित बाग तोडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डाळिंब बागा वाचविण्यासाठी 5 कोटी लिटर पाणी क्षमतेचे 2 शेततळे त्यांनी बांधले होते. दरवर्षी एकरी मोठा खर्च करूनही तोटाच होत आहे. त्यामुळे पोटापुरतेच पिकवून शेतकरी संपात मी सामील होणार असल्याची माहिती शेतकरी हेमंत अंबादास चौधरी यांनी दिली आहे.