By
Posted on
नाशिक : निफाड तालुक्यातील टाकळी विंचूर 50 शेतकरयांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर शेतकऱ्यांना सोडवण्यासाठी लासलगाव पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमला आहे.
महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर मध्यरात्रीपासून पोलिसांचा सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
शेतकरी संपाच्या पाचव्या दिवशी आज सकाळी अनेक शेतकऱ्यांनी महामार्गांवर रास्ता रोको झाले. सरकारची प्रतीकात्मक प्रेतयात्रा संतप्त शेतकऱ्यांनी आज अनेक ठिकाणी काढली.
परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी पोलिसांनी टाकळी विंचूर येथील ५० शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. पण शेतकरी ताब्यात घेतल्याची माहिती इतर शेतकऱ्यांना मिळाली त्यांचा मोठा जमाव एकत्र येत लासलगाव पोलीस ठाण्याच्या आवारात शेतकऱ्यांची सुटका करण्यासाठी गेल्याने याठिकाणीही तणावाचे वातावरण आहे.