मी पत्रकार

उत्तल वक्तृत्व कुशलनेतृत्व आणि संघटन कौशल्याने धनंविजय…

उत्तल वक्तृत्व कुशलनेतृत्व आणि संघटन कौशल्याने धनंविजय...

महासत्ता, आदित्य मुंडे :- साधारण 10-15 वर्षांपूर्वी हे नाव महाराष्ट्रात उच्चरल्यावर लोकांमध्ये हा कोणीतरी मोठ्या नेत्याचा पुतण्या बस एवढीच ओळख होती, ह्या उदयोन्मुख नेत्याला खरी ओळख भेटायला सुरुवात झाली 2012 सालीच्या बंडामुळे, महाराष्ट्रात जवळपास 40 वर्ष एक प्रकारे राजकारण गाजवून सोडणाऱ्या आणि प्रस्थापित असलेल्या गोपीनाथ मुंडें साहेबांविरोधात बंड करणे म्हणजे खूप मोठी घटना त्यावेळी मानली गेली , पण म्हणतात ना बंड करणे खूप सोप्पे पण ते यशस्वी करून दाखवणे खूप अवघड..!

2012 सालापासून आज पर्यंतची या उदयोन्मुख नेतृत्वाची वाटचाल म्हणजे ते बंड एकप्रकारे यशस्वीच होय, 2012 साली गोपीनाथ मुंडे साहेबांची साथ सोडल्यानंतर ह्या पोराचे काय खरे आहे , काकाच्या जीवावर आजपर्यंत चालले होते , ह्याचे राजकारण संपल्यात जमा इत्यादी, अगदी आह से लेकरं आह तक बऱ्याच चर्चा गावागावातील चावडीवर झाल्या , आणि याची सुरुवात झालीसुद्धा अशीच काही, महिन्याच्या अंतराने झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये विरोधकांनी भावनेच्या आधाराने धनंजय मुंडेंना संबंध लोकांमध्ये एकप्रकारे खलनायक ठरवले, याचा परिणाम म्हणजे धनंजय मुंडेंना नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषदेत पूर्ण पणे पराभवाचा सामना करावा लागला , स्वतः पंडित अण्णा मुंडे यांना सुद्धा पराभव पाहावा लागला.

एखाद्या खलास्याने पृथ्वी प्रदक्षिणा घालण्यासाठी आपली जहाज तयार करणे आणि ती तिच्या पहिल्याच सफरी मध्ये बुडणे असाच काहीसा प्रकार धनंजय मुंडेंच्या बंडाच्या बाबतीतही त्यावेळी झाला, अपुरा वेळ , संघटन बांधणीचा अभाव ह्याचा फटका धनंजय मुंडेंना त्यावेळी बसला ,पण खचून जातील ते धनंजय मुंडे कसले , लागलीच त्यांनी आपला स्वतःचा रस्ता स्वतः बनवायला सुरुवात केली, पक्षाचे मेळावे घेणे , गावोगावी जाऊन लोकांना सत्यपरिस्थीती सांगून मतपरिवर्तन करणे , आणि कार्यकर्त्यांची एक विस्कटलेली घडी पुन्हा एकदा बसवून एक नवीन सुरुवात करणे, ह्याचा एकत्रीत परिणाम 6 महिन्यांनी झालेल्या ग्रामपंचायात निवडणुकीत दिसून आला, ज्या परळी तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये भाजप सोडून कोणताच पक्ष निवडून येऊ शकत नाही हा जर इतिहास असेल आणि धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी म्हणून जन्मगाव नाथरासाहित तालुक्यातील 80 टक्के ग्रामपंचायती जिंकून त्यावेळी आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली..

लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराला हमखास 50 हजारापेक्षा जास्त मताधिक्य मिळवून देणाऱ्या परळी मतदारसंघाचे लीड सुद्धा 30 हजारांनी घटवून दाखविलं, 3 वर्षांपूर्वी च्या विधानसभा निवडणुकीत सत्तेबाबत असलेली एकूणच अँटी इंकंबन्सी , सत्ता बदल करण्याचा असलेलं एकूणच जनमानस , मोदी लाट , मुंडे साहेबांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेली सहानुभूती असूनही धनंजय मुंडेंना विधानसभा जिंकण्यासाठी 15 ते 20 हजार मते कमी पडली, म्हणतात ना सूर्य कधी तळ हाताने झाकत नाही तसंच काहीसे धनंजय मुंडेंच्या बाबतीत झालं , विधानसभा निवडणुकीत पराभव होऊन देखील धनंजय मुंडेंवर विधान परिषद विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी पवार साहेबांसारख्या जोहरीने टाकली, विरोधी पक्षनेते पद मिळाल्यापासून धनंजय मुंडें मध्ये एकप्रकारे वेगळाच उत्साह संचारला गेला, आपली आक्रमक वक्तृत्वशैली , सत्ताधाऱ्यांवर तुटून पडायची हातोटी , भारदस्त शरिरयष्टी ,आणि त्या जोडीला राजकारणी आवाज ह्यामुळे भल्या भल्या मंत्र्यांना मुंडेंचा धाक वाटायला लागला, चिक्की घोटाळा प्रकरण असो कि बोगस डिग्री असो , कोपरडी येथील बलात्काराची घटना असो की शेतकऱ्यांची अडचण ,मुंडेंनी सरकारला असे काही अडचणीत आनले कि बस्स….!

सभागृहात त्यांचे भाषण सुरु झाले की सत्तेतील काही मंत्री सभागृहात येण्यास धजावतात इतकं स्पष्ट आणि पुराव्यासाहित ते एखाद्या प्रकरणाची चिरफाड करतात, आपले एखादे काम धनंजय मुंडेंकडे घेऊन गेल्यास ते या सरकारला वाकवू शकतात हि खात्री सर्वसामान्य जनतेला पटू लागली आणि मुंडेंच्या कार्यालयात ह्या जुलमी राज्य सरकार विरोधात गाऱ्हाणी मांडायला लोक येऊ लागली ,मुंडेंही त्या सर्वांच्या समस्या जातीने समजावून घेऊन स्वतःची समस्या असल्यासारखे त्यात लक्ष घालतात आणि ती मार्गी लावतात, अशाप्रकारे हे नेतृत्व हळू हळू संबंध महाराष्ट्रच्या जनतेच्या संपर्कात जात आहे , मुंडेंची खासियत म्हणजे त्यांचे वक्तृत्व होय, एखाद्या दगडाला देखील पाझर फुटेल इतके त्यांचे वक्तृत्व प्रभावशाली , कुठलीही निवडणूक असली की पक्ष्याचे उमेदवार आम्हाला धनंजय मुंडेंची सभा द्या असा आग्रह करतात आणि मुंडे त्यांच्या मदतीसाठी जातातही , कुठलाही नेत्याला राज्याचे नेतृत्व करत असताना स्वतःच मतदारसंघ सांभाळायची तारेवरची कसरत करावी लागते , त्यातही मुंडे तरबेज निघाले ह्याचा पुरावा म्हणजे मागच्या 8 महिन्यातील परळी मधील 4 निवडणूका होय , नगरपालिका असो की पंचायत समिती , किंवा जिल्हा परिषद असो की बाजार समिती धनंजय मुंडेंचा वारू चौफेर उधळला गेला, विरोधातील नेतृत्व राज्याच्या मंत्री मंडळात तब्बल 4 खात्याचा मंत्री असताना देखील परळीकर जनतेने विरोधी पक्षातील एका नेत्याच्या पारड्यात आपला कौल द्यावा हा म्हणजे त्यांचा आपल्या लाडक्या नेतृत्वावरील विश्वास होय…..!
प्रतिष्ठित राजकीय पार्श्वभूमी असलेल्या घराण्यात जन्म होऊन देखील धनंजय मुंडेंना काही वशिलेबाजी ने मिळाले नाही , ते त्यांनी मिळवले स्वकर्तृत्वानेच…!
म्हणतात ना जर तुमच्यात दम असेल कर्तृत्व असेल आणि तुमची नाळ सर्वसामान्य जनतेशी जुळलेली असेल तर राजकारणात तुम्हाला मोठं होण्यापासून कोणी रोखू शकत नाही हे धनंजय मुंडेंकडे पाहिल्यास समजते.
महाराष्ट्रच्या या युवा नेत्तुवाचा आज वाढदिवस , त्यांना वाढदिवसानिम्मित मनःपूर्वक शुभेच्छा , भविष्यात आपले नेतृत्व अधिकच बहरत जाऊन शोषितांच्या , पीडितांच्या कामी येऊ एवढीच अपेक्षा , धन्यवाद !

लेख
आदित्य मुंडे

 

उत्तल वक्तृत्व कुशलनेतृत्व आणि संघटन कौशल्याने धनंविजय…
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top