महासत्ता :- पारदर्शकतेच्या नावाखाली भाजपा सरकार भ्रष्टाचाराला खतपाणी घालत आहे.
ज्या येवलेना पैसे देऊन हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला.त्याच्या सहित सर्व सहभागी व्यक्तींची नार्को टेस्ट करण्यात यावी,आणि विश्वास पाटील यांनी SRD ज्या ओंकार बिल्डरचे जेवढया प्रकल्पांना मंजुरी दिली, त्या सर्व प्रकल्पांना स्थगिती देण्यात यावी.
काय आहे प्रकरण?
विक्रोळीच्या पार्कसाईट भागातील हनुमाननगरमध्ये एसआरए योजना
ओंकार बिल्डर्सचा झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प
या प्रकल्पात अनेक अनियमितता असल्याचा स्थानिकांचा आरोप
प्रकल्पातल्या भ्रष्टाचाराविरोधात संदीप येवले यांचा आवाज
‘झोपु’चे तत्कालिन सीईओ विश्वास पाटील यांच्याकडून येवलेंना मॅनेज करण्याचा प्रयत्न
ओंकार बिल्डर्सकडून येवलेंना 11 कोटींची लाचेची ऑफर
लाचेचा पहिला एक कोटी रुपयांचा हप्ता येवलेंना दिला
येवले एक कोटी रूपये घेऊन माध्यमांसमोर
=========================================================================
कोण आहेत संदीप येवले ?
संदीप येवले विक्रोळी भागातले
सामाजिक कार्यकर्ते
22 वर्षांपासून एसआरए आणि इतर
योजनांमधील भ्रष्टाचाराविरोधात लढा
आतापर्यंत संदीप येवलेंवर 4 वेळा हल्ला
लढाईसाठी घरंही विकलं
संदीप येवलेंवर भ्रष्टाचाराचे खोटे गुन्हे
विनयभंगाची तक्रार दाखल करण्याची धमकी
=========================================================================
SRA योजना म्हणजे काय?
– झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण म्हणजेच SRA
– १९९५ साली शिवशाही पुनर्वसन प्रकल्प या नावाने ४० लाख झोपडपट्टीवासीयांना मोफत घरे हि योजना युतीच्या सरकारने प्रथम आणली
– मात्र २०१५ पर्यंत केवळ २ लाख घराचं या योजनेअंतर्गत बांधण्यात आली
– सुरुवातीला १८० स्क्वेअर फुट नंतर २२५ आणि आता २६९ स्क्वेअर फुट घरे देण्यात येतात
– झोपडपट्टी मुक्त मुंबई करण्यासाठी एस आर ए चा फार मोठा हातभार आहे
– एस आर ए योजनेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार
– मात्र एस आर ए योजनेत बिल्डर आणि रहिवाशी यांच्यात वारंवार वाद होत असल्यामुळे एस आर ए योजना रखडतात
– तसेच झोपडपट्टी ते इमारत बांधण्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याने अनेक योजना अजूनही कागदावरच