By
Posted on
महासत्ता : भारताविरुद्धच्या कसोटी सामन्याआधी यजमान श्रीलंकेला मोठा धक्का बसलाय. श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडीमल खेळणार नाहीये. त्याला न्यूमोनिया झालाय. त्यामुळे दुसरी कसोटीही तो खेळणार की नाही याबाबत शंका आहे.
अँजेलो मॅथ्य़ूजनंतर चंडीमलकडे श्रीलंकेचे कर्णधारपद सोपवण्यात आले. २७ वर्षीय नवनियुक्त कर्णधार चंडीमलवर सध्या उपचार सुरु आहेत. झिम्बाब्वेविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात चंडीमलने नेतृत्व केले होते.
२६ जुलैपासून भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होतेय. त्यानंतर भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच वनडे आणि एकमेव टी-२० सामना होणार आहे.
