मुख्य बातम्या

सरकारचा कारभार गोल गोल , त्यांच्या कारभारात मोठा झोल झोल – मा.धनंजय मुंडे

सरकारचा कारभार गोल गोल आहे, त्यांच्या कारभारात मोठा झोल झोल - मा.धनंजय मुंडे

महासत्ता :- सरकारला तीन वर्षे पूर्ण होत आहे पण सरकारचा कारभार गोल गोल आहे, त्यांच्या कारभारात मोठा झोल झोल आहे. हे सरकारमध्ये सोनू शेठ लोक आहेत जे शेठ लोकांच्या फायद्यासाठीच काम करतात म्हणून नागरीकांचा त्यांच्या भरोसा राहिला नाही. उद्याच्या अधिवेशनात राज्यातील सर्वच प्रमुख मुद्द्यावरून आम्ही सरकारला धारेवर धरणार आहोत. सरकारने मोठा गाजावाजा करत कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीचा निर्णय घेऊन एक महिना पूर्ण झाला आहे मात्र एकाही शेतकऱ्याला त्या कर्जमाफीची फायदा झाला नाही. उलट सरकारने कर्जमाफी केल्याच्या जाहिरातींवरच ३६ लाख रुपये खर्च केले. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना मुंडे म्हणाले की आरक्षणाचा मुद्दा आला की शिवस्मारकाची घोषणा केली जाते. कर्जमाफीचा प्रश्न चिघळला की शिवाजी महाराजांच्या नावे योजना घोषीत केली जाते. पण आतापर्यंत राज्यातील जनतेला ना शिवस्मारक मिळालं ना कोणत्या योजनेचा लाभ मिळाला. सरकारने केलेल्या कर्जमाफीची घोषणा फसवी निघाली आता हे शेतकऱ्यांना कळून चुकलं आहे.

राज्यभर सम्रुद्धी महामार्गाविरोधात आंदोलन होत आहे. सम्रुद्धी महामार्ग झाला तर अनेकांना भूमीहीन व्हावं लागेल. हे सरकार शेतकऱ्यांची जातच नष्ट करायला निघालं आहे.कश्मीर सारख्या प्रांतात पॅलेट बुलेट वापरावं की नाही याचा विचार होत आहे मात्र महाराष्ट्रात नेवाळी या गावात शेतकऱ्यांवर पॅलेट बुलेटचा वापर करण्यात आला. राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा वाजले आहेत. सरकारचं रामराज्य फक्त कागदावरच आहे का असा सवाल खुद्द कोर्टाने उपस्थित केलाय. उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात या सर्व गोष्टींवर सरकारला जाब विचारू. गृहनिर्माण प्रकल्पाचा जो भ्रष्टाचार सध्या गाजतोय त्याचे धागेदोरे गृहनिर्माण मंत्र्यांपर्यंत आहेत त्याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी.

सेनेने कर्जमाफीसाठी महापालिकेचे 60 हजार कोटी रूपये द्यावेत

राज्यातील अनेक भागात अद्याप हवा तसा पाऊस झाला नाही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट घोंगावत आहे. अशामध्ये खते, बियांणासाठी सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी. कर्जमाफी, समृद्धी महामार्ग या विषयांवर शिवसेनेची भूमिका ही दुट्टपी आहे. शिवसेनेला जर खरंच शेतकऱ्यांच्या दुखाची जाण असेल तर त्यांनी मुंबई महानगरपालिकेची ६० हजार कोटींच्या ठेवी शेतकऱ्यांसाठी द्यावी. बँकांसमोर ढोल बडवल्याने काही एक होणार नाही,

सरकारचा कारभार गोल गोल , त्यांच्या कारभारात मोठा झोल झोल – मा.धनंजय मुंडे
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top