महासत्ता : मागील डिसेंबर महिन्यात मराठा समाजाकडून हिवाळी अधिवेशना दरम्यान नागपूरमध्ये लाखोंच्या संखेत ‘मराठा क्रांती मोर्च्या’ काढण्यात आला होता. यावेळी समाजाच्या मागण्या संदर्भात मोर्चाच्या प्रतिनिधींची मुख्यमंञ्यासोबत बैठक झाल्याच सांगण्यात आले होते, मात्र. अशी कोणतीच बैठक झाली नसल्याचे उत्तर सरकारकडून देण्यात आल्याची माहिती विधानपरिषद विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे यांनी दिली आहे. तसेच प्रतिनिधीकडून देण्यात आलेल्या निवेदनावरही कोणतीच कारवाई झाली नसल्याच सरकारकडून सांगण्यात आल आहे.
सरकार मराठा समाजाची फसवणूक करत आहे.
“डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनावर काढलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या प्रतिनिधींची मुख्यमंञ्यासोबत झालेली बैठक व निवेदनावर पुढे काय कार्यवाही झाली ? याबद्दल शासनाला विचारले असता बैठकच झाली नाही असे मला शासनाकडून उत्तर मिळाले आहे. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या प्रतिनिधींनी दिलेल्या निवेदनावर आठ महिने उलटून सुद्धा कोणतीच कारवाई झाली नाही असे सरकार लेखी सांगत आहे. त्यामुळे हि राज्यातील मराठा समाजाची शुद्ध फसवणूक आहे. या संदर्भात मी अधिवेशनात आवाज उठवणार आहे – धनंजय मुंडे ( विरोधी पक्ष नेते , विधानपरिषद )
