परळी :- नाथरा ग्रामपंचायती नंतर प्रतिष्टेची समजलेली गोपीनाथगड (पांगरी) ग्रामपंचायत ना.धनंजय मुंडे यांच्या ताब्यात घेत विजय मिळवला.
बारा सदस्य असणाऱ्या या ग्रामपंचायतीमध्ये धनंजय मुंडे गटाचे दहा सदस्य निवडून आले आहेत. तसेच सरपंचपदीही राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला आहे. यापूर्वी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे जन्मगाव असलेल्या नाथरा ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. या ठिकाणी नऊपैकी पाच सदस्य राष्ट्रवादी पुरस्कृत तर चार भाजप पुरस्कृत होते. सरपंचपदही राष्ट्रवादीच्या वाटयाला आले. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनी ज्या गावात गोपीनाथ गड उभारला त्या पांगरी गावच्या ग्रामपंचायतीवरही राष्ट्रवादीची सत्ता आली आहे.
पांगरी ग्रामपंचायत विजयी उमेदवारांची यादी
सरपंच
अक्षता सुशिल कराड
सदस्य:- वॉर्ड -१
१. सचिन संजीवन तिडके
२. अश्वमिता दिगंबर खेत्रे
वॉर्ड -२
१. दत्तु लक्ष्मण कराड
२. मुंजाजी भागोजी पाचांगे
३.आशा सुमंत पाचांगे
वॉर्ड – ३
१. श्रीनिवास धोंडिबा मुंडे
२. गिरजा वाल्मिक पाचांगे
३. वैजयंती देविदास मुंडे
वॉर्ड – ४
१. शिवाजी सोमा राठोड
२. सुंदराबाई प्रभाकर चव्हाण
सर्व राष्ट्रवादी
पुष्पा महादेव मुंडे (भाजप)
