परळी तालुक्यात राष्ट्रवादीचा 41 ग्रामपंचायतीमध्ये विजय; 80 % ग्रामपंचायतीवर ना. धनंजय मुंडे यांचे वर्चस्व
भाजपाला गोपीनाथगडाचा पराभव जिव्हारी लागला; अपयश झाकण्यासाठी माध्यमातून चुकीच्या बातम्या
परळी – बीड जिल्ह्यात आणि विशेषतः परळी मतदार संघातील नगरपालिका, जिल्हा परिषद , पंचायत समिती, मार्केट कमिटी निवडणुकीतील पराभवा पाठोपाठ ग्रामपंचायत निवडणुकीतही झालेल्या दारुण पराभवामुळे भाजपा हादरून गेली आहे. त्यातच प्रतिष्ठेच्या नाथ्रा पाठोपाठ गोपीनाथ गड ग्रामपंचायतीतील प्रराभव चांगलाच जिव्हारी लागला असून हे अपयश झाकण्यासाठी भाजप कडून आता चुकीच्या बातम्या देऊन मतदारांची दिशाभूल केली जात आहे.
परळी तालुक्यात राष्ट्रवादीला 74 पैकी 41 ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळाला असून 80 % ग्रामपंचायतीवर विधान परिषद विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांनी वर्चस्व मिळवले आहे. परळी मतदार संघातही राष्ट्रवादीचा बोलबाला सिद्ध झाला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला धोबीपछाड देत 80 % ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळवला आहे. प्रतीष्ठेची नाथ्रा हि आधीच बिनविरोध ncp ने जिंकली आहे तर आज गोपीनाथगड असलेली पांगरी ग्रामपंचायत मध्ये दणदणीत विजय मिळवला. तसेच भाजपाच्या मंत्री आणि खासदारांनी खासदार, आमदार दत्तक योजनेअंर्गत निवड केलेली पोहनेर ग्राम पंचायत हि राष्ट्रवादीने जिंकली आहे. या शिवाय तालुक्यात मतदान झालेल्या 74 पैकी राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. Bjp ला केवळ 29 तर काँग्रेस व अपक्ष यांना प्रत्येकी 2 ग्रामपंचायती मध्ये विजय मिळाला आहे. राष्ट्रवादीने जिंकलेल्या ग्रामपंचायती मध्ये ….1. बोरखेड, 2. बेलंबा ,
3. चांदापुर 4. गोवर्धन 5. जयगांव 6.तळेगांव 7. नागदरा
8. कौडगांव हुडा 9. वाका 10. तडोळी 11 कौठळी
12. धर्मापुरी 13. पोहनेर 14. लमानतांडा परळी
15. नंदागौळ 16. टाकळी देशमुख 17. लोणी
18. बोधेगांव 19 आचार्य टाकळी 20. दौनापुर
21. नाग पिंप्री 22. पांगरी 23. सेलु परळी
24. नागापुर 25 सेलु 26. लेंडेवाडी 27. कावळ्याचीवाडी
28. पिंप्री बु 29. माळहिवरा/गोपाळपुर 30. वाघबेट
31. दाऊतपुर 32. मांडवा परळी 33. भिलेगांव
34. औरंगापुर 35. डिग्रस 36. सारडगांव 37. कासारवाडी
38. परचुंडी 39. मलनाथपुर 40. संगम 41. वानटाकळी
या गावांचा समावेश आहे.
दरम्यान विजयी उमेदवारांचे विधान परिषद विरोधी पक्षनेते ना. धनंजय मुंडे यांनी अभिनंदन केले आहे. जगमित्र कार्यालयात आज कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दरम्यान या पराभवामुळे खचलेल्या भाजपने खोट्या बातम्या देऊन आपली अब्रू झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु केला आहे. त्यांनी कितीही कोंबडे झाकण्याचा प्रयत्न केला तरी सुरु उगवायचा राहत नाही असा टोला राष्ट्रवादीने लगावला आहे.
