मुख्य बातम्या

वैद्यनाथची दुर्घटना दडपण्याचा पालकमंत्र्यांचाच प्रयत्न; पाच मृत्यु आणि तीन गंभीर असुनही कोणीच दोषी नाही का ? – ना.धनंजय मुंडे

वैद्यनाथची दुर्घटना दडपण्याचा पालकमंत्र्यांचाच प्रयत्न; पाच मृत्यु आणि तीन गंभीर असुनही कोणीच दोषी नाही का ? - ना.धनंजय मुंडे

Mahasatta परळी वै.दि.11…………..वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील दुर्घटने प्रकरणी आम्हाला राजकारण करायचे असते तर घटनेच्या दिवशीच संचालक मंडळावर कारवाई करण्याची मागणी केली असती, कारवाई झाल्याशिवाय गेट समोरून उठलो ही नसतो. मात्र घटनास्थळी आम्हाला जाण्यापासुन रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या मनातच ही घटना दडपण्याचा डाव आहे की काय असा संशय आता निर्माण होत असल्याचा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

परळीच्या वैद्यनाथ कारखान्यातील गरम ऊसाच्या रसाचा हौद फुटुन पाच कर्मचाऱ्यांचा भाजुन मृत्यु झाला आणि इतर सात कर्मचारी गंभीर जखमी झाले असुन, त्यापैकी तीन मृत्युशी झुंज देत आहेत. घटना समजताक्षणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते घटनास्थळ ते रूग्णलयापर्यंत मदत कार्यात सक्रिय सहभागी झाले होते. या भागातील लोकप्रतिनिधी, विरोधी पक्षनेते आणि कारखान्याचे सभासद म्हणुन श्री.धनंजय मुंडे हे रविवारी घटनास्थळी भेट, मृत कुटुंबियांचे सांत्वन आणि जखमींची विचारपुस करण्यासाठी आले असता कारखान्याच्या चेअरमन तथा पालकमंत्री पंकजाताई पालवे-मुंडे यांनी पदाचा गैरवापर करत पोलीसांना उघडपणे पत्र देऊन त्यांना घटनास्थळी जाण्यापासुन रोखले. ऐवढेच नव्हे तर संस्थेचे प्रमुख म्हणुन घटना का घडली, त्याला जबाबदार कोण हे शोधण्यापेक्षा विरोधी पक्षनेत्यांवरच आरोप करणे सुरू केल्याने या दु:खद घटनेचेही राजकारण करणाऱ्या कारखान्याच्या चेअरमन बाबत कारखाना परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

पंकजाताई पालवे यांनी केलेल्या आरोपांना प्रतिउत्तर देताना ना.धनंजय मुंडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ऐवढी मोठी घटना घडुन चार दिवस उलटल्यानंतरही साधा गुन्हा ही दाखल होत नाही. राजकारण करायचे असते तर आम्ही चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळावर कारवाई करण्याची मागणी केली असती मात्र तशी मागणी केली नाही तर या घटनेस जे खरोखरच जबाबदार  आहेत त्या कारखान्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशीच आमची मागणी आहे. पाच व्यक्तींचा मृत्यु झाल्यावर या मानवनिर्मित चुकीबद्दल कोणाला दोषी ही धरायचे नाही का ? ज्यांचे जिव गेले त्यास कोणीच जबाबदार नाही का ? असा सवाल उपस्थित करतांनाच राजकारण करायचे असते तर कारवाई झाल्याशिवाय गेट सोडले नसते अशा शब्दात सुनावले आहे. या घटनेच्या  चौकशीत खोलात गेल्यास बऱ्याच गोष्टी उघड होणार असल्याचे ही ते म्हणाले.

दु:खद दुर्घटने प्रकरणी पोलीसांच्या तपासात हस्तक्षेप करून, याला रोखा, त्याला रोखा असे पत्र देण्यापेक्षा स्वत:हुन घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असते तर त्या मृत आणि जखमी कामगारांबद्दल संस्थेचे प्रमुख म्हणुन तुम्हाला आस्था, प्रेम आहे असे वाटले असते असे ही त्यांनी म्हटले आहे. आम्ही फक्त दु:खीतांचे सांत्वन करण्यासाठी आलो होतो. हे सांत्वन करतांना कोणाचे जास्त फोटो वर्तमान पत्रात छापुन आले आहेत हे एकदा स्वत: तपासुन पहावे असा टोला ही त्यांनी लगावला आहे. या घटनेतील मृत्युस जबाबदार असणाऱ्यां विरूध्द कारवाई होत नाही तो पर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही असे ही मुंडे  म्हणाले.

—————–

द्यनाथची दुर्घटना दडपण्याचा पालकमंत्र्यांचाच प्रयत्न; पाच मृत्यु आणि तीन गंभीर असुनही कोणीच दोषी नाही का ? – ना.धनंजय मुंडे*

परळी वै.दि.11…………..वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील दुर्घटने प्रकरणी आम्हाला राजकारण करायचे असते तर घटनेच्या दिवशीच संचालक मंडळावर कारवाई करण्याची मागणी केली असती, कारवाई झाल्याशिवाय गेट समोरून उठलो ही नसतो. मात्र घटनास्थळी आम्हाला जाण्यापासुन रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या मनातच ही घटना दडपण्याचा डाव आहे की काय असा संशय आता निर्माण होत असल्याचा आरोप विधान परिषद विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

परळीच्या वैद्यनाथ कारखान्यातील गरम ऊसाच्या रसाचा हौद फुटुन पाच कर्मचाऱ्यांचा भाजुन मृत्यु झाला आणि इतर सात कर्मचारी गंभीर जखमी झाले असुन, त्यापैकी तीन मृत्युशी झुंज देत आहेत. घटना समजताक्षणी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते घटनास्थळ ते रूग्णलयापर्यंत मदत कार्यात सक्रिय सहभागी झाले होते. या भागातील लोकप्रतिनिधी, विरोधी पक्षनेते आणि कारखान्याचे सभासद म्हणुन श्री.धनंजय मुंडे हे रविवारी घटनास्थळी भेट, मृत कुटुंबियांचे सांत्वन आणि जखमींची विचारपुस करण्यासाठी आले असता कारखान्याच्या चेअरमन तथा पालकमंत्री पंकजाताई पालवे-मुंडे यांनी पदाचा गैरवापर करत पोलीसांना उघडपणे पत्र देऊन त्यांना घटनास्थळी जाण्यापासुन रोखले. ऐवढेच नव्हे तर संस्थेचे प्रमुख म्हणुन घटना का घडली, त्याला जबाबदार कोण हे शोधण्यापेक्षा विरोधी पक्षनेत्यांवरच आरोप करणे सुरू केल्याने या दु:खद घटनेचेही राजकारण करणाऱ्या कारखान्याच्या चेअरमन बाबत कारखाना परिसरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

पंकजाताई पालवे यांनी केलेल्या आरोपांना प्रतिउत्तर देताना ना.धनंजय मुंडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ऐवढी मोठी घटना घडुन चार दिवस उलटल्यानंतरही साधा गुन्हा ही दाखल होत नाही. राजकारण करायचे असते तर आम्ही चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक मंडळावर कारवाई करण्याची मागणी केली असती मात्र तशी मागणी केली नाही तर या घटनेस जे खरोखरच जबाबदार  आहेत त्या कारखान्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशीच आमची मागणी आहे. पाच व्यक्तींचा मृत्यु झाल्यावर या मानवनिर्मित चुकीबद्दल कोणाला दोषी ही धरायचे नाही का ? ज्यांचे जिव गेले त्यास कोणीच जबाबदार नाही का ? असा सवाल उपस्थित करतांनाच राजकारण करायचे असते तर कारवाई झाल्याशिवाय गेट सोडले नसते अशा शब्दात सुनावले आहे. या घटनेच्या  चौकशीत खोलात गेल्यास बऱ्याच गोष्टी उघड होणार असल्याचे ही ते म्हणाले.

दु:खद दुर्घटने प्रकरणी पोलीसांच्या तपासात हस्तक्षेप करून, याला रोखा, त्याला रोखा असे पत्र देण्यापेक्षा स्वत:हुन घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले असते तर त्या मृत आणि जखमी कामगारांबद्दल संस्थेचे प्रमुख म्हणुन तुम्हाला आस्था, प्रेम आहे असे वाटले असते असे ही त्यांनी म्हटले आहे. आम्ही फक्त दु:खीतांचे सांत्वन करण्यासाठी आलो होतो. हे सांत्वन करतांना कोणाचे जास्त फोटो वर्तमान पत्रात छापुन आले आहेत हे एकदा स्वत: तपासुन पहावे असा टोला ही त्यांनी लगावला आहे. या घटनेतील मृत्युस जबाबदार असणाऱ्यां विरूध्द कारवाई होत नाही तो पर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही असे ही मुंडे  म्हणाले.

—————–

वैद्यनाथची दुर्घटना दडपण्याचा पालकमंत्र्यांचाच प्रयत्न; पाच मृत्यु आणि तीन गंभीर असुनही कोणीच दोषी नाही का ? – ना.धनंजय मुंडे
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top