महाराष्ट्र

मी स्वत: मत देऊनही मला शून्य मतं, साकीनाक्यातील अपक्ष उमेदवाराची तक्रार

मी स्वत: मत देऊनही मला शून्य मतं, साकीनाक्यातील अपक्ष उमेदवाराची तक्रार

मुंबई : राज्यभरात ईव्हीएम मशीनच्या गोंधळाची चर्चा सुरु असताना आता आणखी एक घोटाळा समोर आला आहे. मुंबई उपनगरातील साकीनाका भागात श्रीकांत शिरसाठ या अपक्ष उमेदवाराला चक्क शून्य मतं मिळाली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे शिरसाठ यांनी स्वत:ला मतदान केलं होतं. त्यामुळे आपण आणि आपल्या कुटुंबियांनी दिलेल्या मतांचं काय असा प्रश्नच शिरसाठांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे.

नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत श्रीकांत शिरसाठ आणि त्यांच्या कुटुंबियांनी श्रीकांत शिरसाठ यांना मत दिलं होतं. असं असताना आपल्याला शून्य मतं कशी पडली, असा प्रश्न त्यांनी निवडणूक आयोगाला विचारला आहे. याप्रकरणी श्रीकांत शिरसाठ यांनी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त सहारिया यांना निवेदन दिलं  आहे.

श्रीकांत शिरसाठ हे सकिनाका 90-फिट, वार्ड क्रमांक 164 मध्ये अपक्ष म्हणून पालिका निवडणूक लढत होते. या प्रभागातील इतर उमेदवारही श्रीकांत शिरसाठ यांच्यासोबत  ईव्हीएम मशीनच्या घोटाळ्याबाबत कोर्टात जाणार असल्याचं शिरसाठ यांनी सांगितलं.

मी स्वत: मत देऊनही मला शून्य मतं, साकीनाक्यातील अपक्ष उमेदवाराची तक्रार
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top