महाराष्ट्र

पुण्यात ईव्हीएम मशीनची अंत्ययात्रा; पराभूत उमेदवारांचा संताप

पुण्यात ईव्हीएम मशीनची अंत्ययात्रा; पराभूत उमेदवारांचा संताप

पुणे महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी आज मंगळवारी बालगंधर्व चौक ते संभाजी बागेदरम्यान ईव्हीएम मशीनची अंत्ययात्रा काढली. या निवडणुकीमध्ये मशीनमध्ये ‘सेटींग’ करण्यात आल्याने आमचा पराभव झाला आहे. यातून लोकशाहीचा गोळा घोटण्याचे काम केले आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यात याव्यात, अशी मागणीही यावेळी आंदोलकांनी केली.

महापालिका निवडणुकांमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केल्याचा आरोप होत आहे. हा घोटाळ्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुण्यात पराभूत उमेदवारांनी ईव्हीएम मशीनची अंत्ययात्रा काढली. मशीनमध्ये सेटींग केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुण्यात रविवारी मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती पराभूत उमेदवार दत्ता बहिरट यांनी दिली. पुणे महापालिका निवडणुकीत पराभूत उमेदवारांनी बालगंधर्व चौक ते वैकुंठ स्मशानभूमीदरम्यान ईव्हीएम मशीनची अंत्ययात्रा काढली. या मोर्चाला साडेअकरा वाजता सुरुवात करण्यात आली. मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मोर्चेकरांनी संभाजी बागेत मोर्चाचा समारोप केला. त्यापूर्वी त्यांनी रस्त्यावर ईव्हीएम मशीन जाळून निषेध व्यक्त केला. बागेत अनेकांची भाषणे देखील झाली. यावेळी स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, सभागृह नेते बंडू केमसे, नगरसेवक दत्तात्रय बहिरट, रुपाली पाटील तसेच शहरातील विविध भागांतील पराभूत उमेदवार उपस्थित होते. महापालिका निवडणुकीत भाजपने मशीनमध्ये सेटिंग केली. त्यामुळे आम्हाला या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या सर्व बाबींचा विचार करीत सुप्रीम कोर्टात दाद मागणार असून प्रशासनानेही भाजपच्या दबावाखाली कामे केली. ही बाब निषेधार्थ असून लोकशाहीला घातक ठरणारी निवडणूक झाली आहे, असे दत्ता बहिरट म्हणाले. दरम्यान, खासदार संजय काकडे यांच्या कार्यालयाच्या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. बालगंधर्व चौकातील मोर्चेकऱ्यांनी राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्याने भाजप कार्यालयाजवळील काकडे यांच्या कार्यालयाच्या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. दरम्यान, ईव्हीएम मशीनमध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा झाला नाही. आरोप तथ्यहिन आहेत, असे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.

पुण्यात ईव्हीएम मशीनची अंत्ययात्रा; पराभूत उमेदवारांचा संताप
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top