बीड: जिल्हा परिषद – निवडणुक 2017 पिंपळनेर गटातुन अतिशय वेगळी ठरली , उमेदवारी नाट्या नंतर ,माघार घेतिल त्या सौ बडे कसल्या , लोकनेते गोपीनाथ मुंडे परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून त्यानी उमेदवारी करण्याचे ठरविले . प्रत्यक्ष लढाई ला सुरवात केली , आघाडी च्या नावनेच बारा हतीचे बळ संचारले . त्यांचे पती श्री रामदास बडे भा ज पा युवा मोर्चा तालुका प्रमुख असल्याने मुंडे साहेबांच्या विचारांची युवा शक्ती त्यानी त्यांच्या मागे ऊभी केली.
चाणक्य नीती वापरून त्यानी बलाढ्य मतदान असणाऱ्या पिंपळनर येथील सौ इंदूबाई गोल्हार व वारणी येथील श्री माधव बडे याना बरोबर घेऊन प्रत्यक्ष नेते,मतदार, ज्येष्ठ मंडळी,तरूण बांधव,कार्यकर्ते यांच्या पर्यंत पोहचून वाडी ,वस्त्या , गांव पिंजुन काढली . राजकीय दिग्गजाना आसमान दाखवत युवक , महिला याना “मुंडे साहेबांची ” परिवर्तनकन्या असल्याचे पटवुन देण्यात त्यानी यश मिळवले व बीड मधे अपक्ष निवडून येणाऱ्या त्या एकमेव सर्वसमान्यातून आलेल्या ठरल्या युवा जिल्हा परिषद “परिवर्तनकन्या”.