माझा जिल्हा

संगणक परिचालक आक्रामक, वेळ आली तर मुंबई जाम करू -शिद्धेश्वर मुंडे

संगणक परिचालक आक्रामक, वेळ आली तर मुंबई जाम करू -शिद्धेश्वर मुंडे

                    

          मुंबई – सरकारच्या उदासीन धोरनामुळे संगणक परिचालक अडचणीत असताना ,सरकार काहि ठोस अस्वासन देत नसल्यामुले  राज्य संघटना आक्रामक दिसत आहेत व  संगणक परिचालक आक्रामक आहेत, वेळ आली तर मुंबई जाम करू असा इशारा राज्य संघटनेने नेते शिद्धेश्वर मुंडे यांनी दिला आहे. राज्यभरातील सुमारे २७ हजार संगणक परिचालकांनी बेमुदत काम बंद आंदोलनास प्रारंभ केला आहे. संग्राम प्रकल्पाऐवजी ‘आपले सरकार’ सेवा केंद्र सुरु करण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे राज्यभरात साडेपाच हजार परिचालकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. याशिवाय अन्य प्रलंबित मागण्यांसाठी राज्य संघटनेने बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे. संगणक परिचालकांचा संग्राम १ या प्रकल्पाची मुदत २०१५ मध्ये संपल्यावर संग्राम २ हा प्रकल्प सुरु करण्यात येईल, अशी अपेक्षा संगणक परिचालकांना होती. पण त्याऐवजी शासनाने ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्र सुरु करुन संग्राम प्रकल्पातील संगणक परिचालकांना समाविष्ट करण्यात येईल असे सांगितले. पण हे केंद्र ग्रामपंचायतींमधे सुरु करण्यासाठी ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न किमान १५लाख असणे गरजेचे असणे बंधनकारक आहे,अशी अट घातली. या ग्रामपंचायतींचे उत्पन्न कमी असेल अशा ठिकाणी दोन ग्रामपचायतींचे क्लस्टर करुन हे केंद्र स्थापन करण्यात आले. याचा फटका राज्यभरातील परिचालकांना बसला. क्लस्टरमधील एका परिचालकावर बेकारीच संकट ओढवले. राज्यभरात सुमारे ५हजार ५०० परिचालक यामुळे बेकार झाल्याचे राज्यसंघटनेचे प्रमुख सिद्धेश्वर मुंडे यानी सांगितले आहे. संग्राम प्रकल्पाच्या समाप्तीनंतर दुसर्‌या प्रकल्पात सर्व परिचालकांना सामावून घेण्यात येईल या शासनाच्या आश्‍वासनावर पाणी फिरले आहे. तसेच नविन प्रकल्पात आपले समायोजन होणार, या अपेक्षेने मागील पूर्ण वर्षभर सर्व परिचालक हे विना मानधन ग्रामपंचायतींमध्ये काम करत आहेत. त्यापैकी काहींवर आता बेरोजगारीची वेळ आली आहे. याशिवाय अन्य मागण्याही परिचालक संघटनेने मांडल्या आहेत. आपले सरकार सेवा केंद्र स्थापून या परिचालकांची नियुक्ती झाली आहे त्यांची नियुक्ती प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारीचे मानधन अद्याप परिचालकांना मिळू शकलेले नाही. दुसरीकडे जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांमधून मार्च क्लोझिंगसाठी दबाव टाकण्यात येत आहे. नोंदी ऑनलाईन न झाल्यास मानधन मिळणार नसल्याचे एसएमएस परिचालकांना येत आहेत. असे असल्यास मागील वर्षभर केलेल्या कामाच्या मानधनाचे काय? असा प्रश्‍न परिचालक संघटनेने उपस्थित केला आहे. परिचालक राज्य संगणक संघटनेने तीन मागण्या प्रामुख्याने मांडल्या आहेत. संग्राम प्रकल्पातील सर्व परिचालकांना आपले सरकार सेवा केंद्रात सामावून घेणे, ग्रामपंचायतींमधून देण्याय येणार्‍या दाखल्यांच्या फी मधील ६० टक्के कमिशन परिचालकांना मिळावे, सेवा केंद्रात जुन्या परिचालकांच्या जागेवर नव्याने समाविष्ट केलेल्या परिचालकांना कमी करत जुन्या परिचालकांचा समावेश करावा या मागण्या संघटनेने मांडल्या आहेत. या मागण्या मान्य होईपर्यंत संघटनेने १ तारखेपासून राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन सुरु केले आहे.

संगणक परिचालक आक्रामक, वेळ आली तर मुंबई जाम करू -शिद्धेश्वर मुंडे
Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Most Popular

To Top