*नाथ प्रतिष्ठानच्या सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळ्यास परळीत उत्साहात प्रारंभ, मुस्लिम, बौध्द विवाह संपन्न*
परळी वै.दि.17………………….. नाथ प्रतिष्ठान आयोजित सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळ्यास परळीत आज सकाळपासुन उत्साहात प्रारंभ झाला. मुस्लिम समाजातील एका तर बौध्द समाजातील बावीस वधु-वरांचे विवाह सकाळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते ना.धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
शहरातील हालगे गार्डन मैदान परिसराला आज सकाळपासुनच लग्न घराचे स्वरूप प्राप्त झाले होते. सकाळी 7 वाजल्यापासुनच वर्हाडी मंडळींचे आगमन होण्यास सुरूवात झाल्याने संपुर्ण वैद्यनाथ मंदिर परिसर लग्नमय झाला होता. सकाळी 10.30 वाजता मुस्लिम समाजातील एक विवाह त्यांच्या धार्मीक पध्दतीनुसार संपन्न झाला. त्या पाठोपाठ बौध्द समाजातील बावीस वधु-वरांचा विवाह त्यांच्या धार्मीक रितीरिवाजानुसार पुज्य भदंते यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. ना.धनंजय मुुंडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुध्दांच्या प्रतिमेचे पुजन करून या सोहळ्याची सुरूवात केली. वधु-वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी बौध्द उपासक-उपासिका शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ना.धनंजय मुंडे यांनी सर्व वधु-वरांना शुभेच्छा देताना त्यांचे वैवाहिक जिवन सुख समृध्दी आणि भरभराटीत जावो अशा शुभकामना व्यक्त केल्या. दुपारपासुनच वर्हाडी मंडळींच्या भोजनास सुरूवात झाली असुन, सायंकाळी 4 वाजता सर्व वधु-वरांची एकत्रित शेवंती मिरवणुक मोंढ्यातील हनुमान मंदिरापासुन काढली जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6.11 मिनिटांनी मुख्य विवाह सोहळा संपन्न होणार असुन यावेळी वधु-वरांना शुभाशिर्वाद देण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.
